"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 198

    *❃करडू, बोकड आणि लांडगा*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एक करडू एका बोकडाबरोबर चरत असता तेथे एका लांडगा आला. करडास बोकडापासून दूर नेऊन मारून खावे, या हेतूने तो त्यास म्हणतो, ‘मुला, तू आपल्या आईस सोडून आलास, हा केवढा मूर्खपणा केलास बरे? तेथे तुला पोटभर दूध प्यावयास मिळाले असते; येथे या रानात तुझे पोट कसे भरणार? तू आपल्या आईकडे जात असलास, तर चल. मी तुझ्या सोबतीस येतो.’ करडू म्हणाले, ‘माझ्या जिवास काही अपाय होऊ नये म्हणूनच आईने मला या बोकडाबरोबर पाठविले आहे: आणि तू तर त्याजपासून मला दूर नेऊन मारून खाऊ इच्छितोस, तेव्हा तुम्हा दोघांपैकी मी कोणाचा विश्वास धरावा, हे तूच सांग बरे?’

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*  अपरिचीतांवर केव्हाही विस्वास ठेवु नये.*

No comments:

Post a Comment