"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 203

   *❃गाढव, माकड आणि चिचुंद्री*
    ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      एके दिवशी एक गाढव आणि एक माकड बोलत बसले होते. गाढव म्हणाले, 'माझे कान इतके लांब आहेत त्यामुळे मला सगळेजण हसतात आणि मला बैलासारखी शिंगही नाहीत.

       माकड म्हणाले, 'माझ्या या लांबच लांब शेपटाची तर मला फारच लाज वाटते. त्याऐवजी मला कोल्ह्यासारखी गोंडेदार शेपूट असतं तर किती मजा आली असती.

      'हे सर्व ऐकून एक चिचुंद्री हळूच पुढे आली आणि म्हणाली, 'तुम्ही उगाच का रडत बसता?
       मला तर शिंग नाहीतच, शेपूटही इतकं आखूड आणि डोळ्यांनी सुद्धा नीट दिसत नाही.
मग माझ्यापेक्षा तुमची स्थिती जास्त चांगली नाही कां ?'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*  देवाने आपणास काय दिले आहे, त्यात समाधानी रहावे.

No comments:

Post a Comment