"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

लोकमान्य टिळक

 *❒ लोकमान्य टिळक  ❒*



 ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक  यांच्या जयंती निमीत्य विनम्र अभिवादन...!!

राजकारणी, वृत्तपत्रकार, वैदिक संशोधक, प्राच्यविद्यापंडित आणि भगवद्गीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म. 'केसरी' व 'मराठा' ही वर्तमानपत्रे सुरू करणाऱ्या टिळकांचे अग्रलेख गाजले आणि ब्रिटिश सरकारची झोप उडवणारे ठरले. मंडालेच्या तुरुंगात असताना 'गीतारहस्य अर्थात कर्मयोगशास्त्र' या ग्रंथाचे लेखन त्यांनी केला. वेदकालनिर्णयावर 'ओरायन' आणि आर्याच्या 
इतिहासशोधाचा' आक्र्टिक होम ऑफ द वेदाज' हे ग्रंथही त्यांनी लिहिले. परखड, सडेतोड राजकीय अग्रलेखांची मराठीतील परंपरा लोकमान्यांशीच नाते सांगते.

●जन्म :~ २३ जुलै १८५६
●मृत्यू :~ १ ऑगस्ट १९२०    

               ◆लोकमान्य बाळ गंगाधर टिळक◆
         टिळकांचे खरे नाव केशव आहे. परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे.
             लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.
             सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला..
🔘 👇🏻👇🏻👇🏻 🔘🔘 👇🏻👇🏻 🔘🔘 👇🏻👇🏻👇🏻 🔘

    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त त्यांचे जीवनकार्य व कर्तृत्वाची महती सांगणारी शिक्षक व विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती Pdf स्वरूपात.... 
लोकमान्य टिळक याच्यावरील मराठी, हिंन्दी, इंग्रजीत भाषणे.
लोकमान्य टिळक यांचा  संपुर्ण जिवन परिचय मराठी, हिंन्दी व इंग्रजीत...

CLICK HERE ⇩⇩⇩ DOWNLOAD


🔘 👇🏻👇🏻👇🏻 🔘🔘 👇🏻👇🏻 🔘🔘 👇🏻👇🏻👇🏻 🔘





No comments:

Post a Comment