"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Ppt तयार करणे


   सोप्या पद्धतीने PPT (पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन) तयार करणे. खालीलप्रकारे आपणास ppt तयार करता येईल.

📺  संगणकातील एम एस पॉवरपॉइंट सुरु करा :~
                सर्वप्रथम आपल्या संगणकातील पॉवरपॉइंट सुरु करावे.पॉवरपॉइंट सुरु केल्यानंतर *blank presentation* ला क्लीक करा.किंवा काही पॉवरपॉइंट मध्ये आधीच ब्लँक प्रर्सेंटशन आलेले असते.


📺  डिजाईन निवडा :~
                ब्लँक प्रेझेन्टेशन सिलेक्ट केल्यानंतर येते ते डिजाईन निवडणे.यासाठी तुमच्या विंडो च्या वर *design* नावाची टॅब आहे त्याला क्लीक करा.डिजाईन क्लीक केल्यास तुम्हाला वेगवेगळ्या डिजाईन दिसतील.तुम्हाला आवडेल ती निवडा.डिजाईन निवडल्यास ती तुमच्या प्रेजेंटशन ला अप्लाय होते.

📺 Title Page तयार करा :~
              Title page तयार करण्यासाठी *'Click to add title'* या ऑप्शन ला क्लीक करा आणि तुमच्या प्रेझेन्टेशन चे नाव ऍड करा.तुमचे title किंवा subtitle टाकण्यासाठी सर्वात खालच्या बॉक्स ला क्लीक करा.एकदा तुम्ही text एंटर केला कि वरच्या भागातील tool bar ला सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या टेक्स्ट चा आकार , रंग तुमच्या इच्छे प्रमाणे बदलू शकता.

📺  slides ऍड करणे :~
                 प्रेझेन्टेशन मध्ये कधीही एक पेक्षा जास्त स्लाईड चा वापर होतो.त्यामुळे आपणास आपल्या प्रेझेन्टेशन मध्ये स्लाईड ऍड कराव्या लागतील. स्लाईड ऍड करण्यासाठी आपल्या स्क्रीन च्या डाव्या बाजूस एक वेगळी जागा दिलेली असते *new slide* नावाने त्याला राईट क्लीक करून स्लाईड ऍड करू शकता किंवा आपल्या स्क्रीन वरील *टूल बार* मध्ये new slide हा ऑप्शन दिसेल त्याला क्लीक करून आपल्याला हवी तशी स्लाईड सिलेक्ट करा.त्यात हवा तो टेक्स्ट टाईप करा.

📺  चित्र, तक्ते, आलेख इ. ऍड करने :~
               शक्यतो प्रेझेन्टेशन च्या वेळेस चित्र, तक्ते, आलेख इ चा वापर होतो.आपणास जर ते ऍड करायचे असेल तर आपल्या स्क्रीन च्या वरच्या बाजूस insert नावाची टॅब दिसेल त्याला क्लिक करा.त्यात तुम्हाला सर्व ऑप्शन दिसतील त्यातील हवा तो क्लिक करून तुम्हाला हव्या त्या स्लाईड मध्ये ऍड करा.

📺  दोन स्लाईड पुढे जाण्याची पद्धत बदलणे (अनिमेशन/transition) :~
                  दोन स्लाईड च्या मध्ये ट्रांजिशन किंवा अनिमेशन ऍड करण्यासाठी पेज च्या वरच्या बाजूस असलेल्या  *'Animations'* या टॅब ला क्लिक करा.yqmdhun तुम्ही वेगवेगळे अनिमेशन सिलेक्ट करू शकता  तसेच त्याचे *preview* पाहू शकता.प्रत्येक स्लाईड ला तुम्ही वेगवेगळा अनिमेशन ठेऊ शकता.

📺  स्लाईड चा क्रम बदलणे :~
              एकदा का तुम्ही तुमच्या सर्व स्लाईड तयार केल्या कि तुम्ही स्लाईड चा क्रम बदलू शकता.तुम्हाला हवी ती स्लाईड हव्या त्या क्रमांकावर ठेऊ शकता.क्रम बदलण्यासाठी स्लाईड वर क्लिक करून स्लाईड ला ड्रॅग करून हव्या त्या क्रमांकावर ठेऊ शकता.

📺 प्रेजेंटशन प्ले करून पाहणे :~
              एकदा का स्लाईड तयार केल्या , अनिमेशन सेट केलं आणि स्लाईड चा क्रम बदलला कि तुमची ppt शेवटच्या टप्प्यात असून आता फक्त ती प्ले करून पाहणे बाकी आहे.ppt प्ले करण्यासाठी पेज च्या वरच्या बाजूस असलेल्या *'Slide Show'* टॅब ला क्लिक करा आणि *'From Beginning'* या ऑप्शन ला सिलेक्ट करा.तुमची ppt प्ले होईल.ppt प्ले करण्यासाठी अजून एक शॉर्टकट म्हणजे *F5* की दाबणे.F5 की दाबल्यास हि ppt प्ले होईल.

📺 *अभिनंदन ...! आता तुम्ही स्वतः पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन तयार करू शकता.


🟣🔵🟥💜🟩🟡🟢


No comments:

Post a Comment