"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022

  पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहावी ते बारावी मोफत आणि दर्जेदार शिक्षणाची सुवर्णसंधी....

                जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा-    
.
        जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकार संचलित निवासी शाळा असून यामध्ये दरवर्षी निवड झालेल्या ऐशी विद्यार्थ्यांना सहावी ते बारावीपर्यंत मोफत CBSE बोर्डाचे शिक्षण दिले जाते. 2022-23 या वर्षात इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाच सहावीत प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचे अर्ज भरता येतील.
      प्रवेश अर्ज हे पुर्णपणे ऑनलाइन पद्धतीने कॉम्प्युटर/मोबाइलवर  किंवा आपल्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय येथे जाऊन भरू शकता. प्रवेश अर्ज भरण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही .


हे अर्ज www.nvsropune.gov.in किंवा

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/?AspxAutoDetectCookieSupport=1

                     लिंक वरून अपलोड करता येतील.
Online फॉर्म भरताना अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-
1. विद्यार्थ्याचा फोटो(jpg format)
2. विद्यार्थ्याची व पालकाची सही
3. वर्ग 5 वीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे शाळेत शिकत असल्याचे सर्टिफिकेट. सोबतच्या PDF मध्ये शेवटच्या पानावर रिकामे सर्टिफिकेट दिलेले आहे.

       विस्तृत माहितीसाठी सोबत दिलेले Notification पहावे किंवा आपल्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

2 comments:

  1. नवोदय सराव प्रश्नपत्रिका असेल तर टाका सरजी

    ReplyDelete
  2. नवोदय परीक्षा निकाल कधी लागणार सर

    ReplyDelete