वेळ वाचवा... संगणक शॉर्टकट वापरा..!!
संगणक वापरताना आपण माऊसचा वापर कमांड देण्यासाठी करत असतो. तर किबोर्ड टायपिंग करण्यासाठी. पण किबोर्डचा वापर फक्त टायपिंगसाठी न करता त्यातील काही शॉर्टकट वापरुन आपण आपला वेळ वाचवू शकतो. याचबरोबर किबोर्डची उपयुक्तता ही वाढते.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
◆ संगणकाचे १० शॉर्टकट ◆
■ Alt + Tab
आपण जर एकाचवेळी अनेक साईट, सॉफ्टवेअर्स वापरत असाल तर या शॉर्टकटचा वापर करुन आपण एका साईट किंवा सॉफ्टवेअरवरुन दुसरे बॅकग्राऊंडला सुरू असणारी साईट किंवा सॉफ्टवेअर उघडू शकता.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
■ Ctrl + Shift + Esc
संगणक हँग झाल्यावर या शॉर्टकटचा वापर करुन आपण टास्क मॅनेजर थेट उघडू शकतो. टास्क मॅनेजरमधून कोणता प्रोग्राम चालत नाही याची माहिती घेऊन तो बंद करु शकतो.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
■ Shift + Delete
आपणला जर कोणतीही फाईल कायमची डिलीट कराची असेल तर आपण या शॉर्टकटचा वापर करुन ती कायमची डिलीट करु शकतो. ती फाईल रिसायकल बीनमध्ये न जाता थेट डिलीट होते.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
■ Windows logo key + L
या शॉर्टकटद्वारे आपण संगणक लॉक करु शकतो. जेणेकरुन आपल्या अनुपस्थितीत त्याचा कोणी गैरवापर करणार नाही.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
■ Ctrl + F4
एकाच सॅफ्टवेअरच्या अनेक फाईल ओपन असतील तर त्या बंद करण्यासाठी या शॉर्टकटचा वापर करता येतो. यामूळे एक एक विंडो बंद करण्याऐवजी एकाचवेळी अनेक विंडो बंद करता येतात.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
■ Ctrl + Y
जसे आपण Ctrl + Z याचा वापर करुन Undo करु शकतो तसेच Ctrl + Y करुन आपण Redo करू शकतो.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
■ Ctrl + Shift with an arrow key
संगणकावर लिखीत माहिती वाचण्यासाठी या शॉर्टकचा वापर करता येतो. यामुळे पेज सरकवणे सोपे जाते.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
■ Windows logo key + D
या शॉर्टकटचा वापर करुन आपण सगळ्या विंडो एकाचवेळी मिनीमाईज करु शकतो. यामुळे आपला प्रत्येक विंडो मिनीमाईज करण्याचा वेळ वाचतो.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
■ Windows logo key + I
या शॉर्टकटचा वापर करुन आपण थेट संगणकाच्या सेटींगमध्ये जातो. यामुळे संगणकाचे सेटिंग कुठे आहे हे शोधत बसावे लागत नाही.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
■ Windows logo key + number
जर तुम्ही ॲप पिन करत असाल तर या शॉर्टकटचा वापर करुन तुम्ही ते ॲप लगेच उघडू शकता. जसे तुम्ही कॅलक्युलेटर चौथ्या क्रमांकावर पिन केले असेल तर विंडो + ४ हा शॉर्टकट वापरल्यास ते ॲप लगेच उघडते.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
🟣🔵🟥💜🟩🟡🟢
Nice blog Sir
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteExcellent Blog Sir,Best wishes to you.
ReplyDeleteSuper sirji
ReplyDelete