"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शिवाजी महाराज मराठी भाषणे


 शिवाजी महाराज मराठी भाषण -1 

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार मांडण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याकरता आयोजकांचे मी आभारी आहे.

    शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्यावर जिजाऊच्या पोटी झाला.

   छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात व  जगाच्या कानाकोपर्यात उत्साहाने साजरी होत आहे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अश्या अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना दिसत आहे. 

शिवछत्रपती महाराज..  मावळ्यांचा मेळ, 

शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांच्या मनगटातील बळ, 

शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार,

शिवछत्रपती म्हणजे छाती वरचा वार, 

शिवछत्रपती म्हणजे मना मनातले धैर्य, 

शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य..!

जय हिंद.. जय महाराष्ट्र..!! जय शिवराय..!!

~~●~~~~●~~

 शिवाजी महाराज मराठी भाषण -2 

    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा.. ! आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो मी सतीश आज एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.

   शिवाजी महाराज त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.

    शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजीराजे, शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवाजी महाराज अवघे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली.

  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचे महान कार्य आपल्या सर्वांना प्रेरणा देते.

“भवानी मातेचा लेक तो….

मराठ्यांचा राजा होता,

झुकला नाही कोणासमोर….

मुघलांचा तो बाप होता !”

~~●~~~~●~~
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
"शिवजयंती' प्रभावी भाषणे  Pdf साठी क्लिक करा..

~~●~~~~●~~

 शिवाजी महाराज मराठी भाषण -3 
    १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.
 

  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी स्वत:चे पायदळ, घोडदळ हे सक्षम केले व यातून स्वराज्यांच्या बांधणीसाठी परकीय सत्तेच्या विनाशासाठी अत्याधुनिक पद्धतीने बांधणी केली. शत्रूचा शंत्रू तो आपला मित्र हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवली. गनिमी कावा पद्धतीने शिवशाहीचा विस्तार केला.
     प्रतापगडाच्या पायथ्याला  अफझलखान चालून आला त्यावेळी महाराजांनी अफझल खानासारख्या शत्रूचा बीमोड केला. पण त्याचे दफन करण्यासाठी मात्र प्रतापगडाच्या पायथ्याला त्यांच्या धार्मिक पद्धतीने दफन करण्यास जागा दिली. लढाईतल्या शत्रूलासुद्धा माणुसकीच्या नात्यानं त्याच्या मृत्यूनंतर त्याचा सन्मान राखणारा व दफनविधीस मदत करणारा असे जगातील हे एक मूर्तिमंत व दुर्मिळ उदाहरण होय.
       म्हणून एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा,
नव्या युगाचा निर्माण करणारा, दुर्जनांचा नाश करता, सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना मानाचा मुजरा.!! मानाचा मुजरा.!!

~~●~~~~●~~

 शिवाजी महाराज मराठी भाषण -4 

      व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय माझे सर्व शिक्षक, माझे प्रिय सर्व वर्गमित्र, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिवभक्तांनो...

    महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये ज्यावेळी अराजकता माजली होती. माणसे गुलामासारखे जीवन जगत होती. कुणीही यावे आमच्यावरती आक्रमण करावे. अशी आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती होती. 

    संपूर्ण हिंदुस्थानामध्ये विखुरलेल्या मावळ्यांना एकसंध करणार नाही, तोपर्यंत बादशाहीचा बीमोड होणार नाही. हे ज्या महापुरुषाने ओळखले, रयतेचे  राज्य ज्या महापुरुषाने आपल्या मन, मनगटाच्या जोरावरती उभे केले स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये महाराष्ट्र धर्म मोठा करून शिवराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच महापुरुषाचे नाव आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज.

   छत्रपती शिवाजी एक शूर योद्धा होते. त्यांच्या धैर्य, पराक्रम आणि कुशाग्र बुद्धीच्या गुणांमुळेच मावळ्यांना मोगल  सैन्यासोबतही लढण्याचे धाडस झाले. 

   छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवरायांची हिंदू धर्मावर अढळ श्रद्धा होती. मानवता आणि मानवी मूल्यांना त्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले. ते खरे देशभक्त होते.

~~●~~~~●~~

 शिवाजी महाराज मराठी भाषण -5 
   छत्रपती शिवाजी
 महाराज यांची जयंती ! ही जयंती आपण ‘शिवजयंती’ म्हणून उत्साहाने साजरी करीत आहोत. सर्वप्रथम, सर्वांना शिवजयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा!
  महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये अराजकता माजली होती… त्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी मर्द मावळ्यांच्या सहकार्याने गनिमी कावा पद्धतीने शिवशाहीचा विस्तार केला.
   सर्वसामान्य स्यतेचे राज्य निर्माण  केले महाराजांनी ६ जून १६६४ रोजी रायगडावरती राज्याभिषेक केला. रयतेला हक्काचा राजा म्हणून आपण जनतेस कटिबद्ध आहोत हे पटवून दिले. नाविक दल आणि समुद्रामध्ये असणाऱ्या किल्ल्यांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले. स्वराज्य निर्मितीसाठी व स्वराज्याच्या उभारणीसाठी सुरतेवरती हल्ला चढवला व यातून स्वराज्याच्या हितासाठी सुरतेवरती हल्ल्यातून मिळालेल्या खजिन्याचा उपयोग केला.

  ~~●~~~~●~~


 शिवाजी महाराज मराठी भाषण -6 

      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा.. !

    सुमारे साडेतीशे वर्षानंतर ही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.

        शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजीराजे, शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. 

    वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली, शूर वीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारांमुळे शिवाजीराजे घडले. 

~~●~~~~●~~
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
"शिवजयंती' प्रभावी भाषणे  Pdf साठी क्लिक करा..

~~●~~~~●~~

 शिवाजी महाराज मराठी भाषण -7 

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार मांडण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याकरता आयोजकांचे मी आभारी आहे.

      लहानपणीच शिवाजी आपल्या वयाच्या पोरांना एकत्र करून किल्ले लढवण्यासाठी आणि बांधण्यासाठी त्यांचा नेता बनत असे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी पुण्यातील तोरणदुर्गवर हल्ला केला आणि जिंकला. दादोजी कोंडदेव यांच्याकडून त्यांना युद्धशास्त्राचे प्रशिक्षण आणि प्रशासनाची समज मिळाली.

     अफझलखानासारख्या बलाढ्य सरदाराला त्यांनी अतिशय हुशारीने ठार मारले होते. शाइस्ता खानला त्यांनी असा धडा शिकवला की तो मरेपर्यंत विसरला नाही.

     ते एक कुशल योद्धा होते.  शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. त्याने स्वबळावर शत्रूंचा पराभव केला म्हणूनच त्यांच्या धाडसी शौर्यामुळे त्यांना आदर्श आणि महान राष्ट्रपुरुष म्हटले जाते.

     शब्द ही पडतील अपुरे अशी शिवरायांची किर्ती.! राजा शोभून दिसे जगती..! असा तो शिवछत्रपती..राजे असंख्य झाले आजवर या जगती..! पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती..!

~~●~~~~●~~

 शिवाजी महाराज मराठी भाषण -8 
    आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.
   शिवराय लहानपणापासूनच खोडकर होते. जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या, कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत. जिजाऊ शिवरायांना म्हणत असत शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा.! स्वराज्य निर्माण करा..!
    जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले.
  ''जेव्हा निश्चय पक्का असेल 
तेव्हा डोंगरही मातीच्या ढिगाऱ्यासारखा भासेल''...
     शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले, संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले.
~~●~~~~●~~

 शिवाजी महाराज मराठी भाषण -9 

     माझे आदरणीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मराठा साम्राज्याचे महान संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.

      दगड झालो तर "सह्याद्रीचा" होईन! माती झालो तर "महाराष्ट्राची" होईन! तलवार झालो तर "भवानी मातेची” होईन! आणि.... पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर "शिवरायांचा मावळा" होईन!!

      शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले, संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले.

   बघा मराठ्यांच्या कुशीत शिवराय जन्मले..! थाप मारताच चाले तलवारीची पाती..येथेच जुळली मराठी मनामनाची नाती.! मनामनाची नाती.! स्वराज्याचा पुरावा देत आहे तेथे एक एक गडा.! येथेच पडला शत्रुच्या रक्ताचा सडा…! शत्रुच्या रक्ताचा सडा..! अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी..!  

~~●~~~~●~~

 शिवाजी महाराज मराठी भाषण -10 
       हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा.. ! आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो मी (नाव) आज एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
     सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टीळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊनी तलवार शत्रुंवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला...
       छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली  इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष नव्हता. तर शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता.
     शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले.
~~●~~~~●~~


No comments:

Post a Comment