"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

February 14, 2019

🙏🏻 भावपूर्ण श्रध्दांजली🙏


    भारतीयांसाठी १४ फेब्रुवारी २०१९ सर्वात वाईट दिवस... काश्मीर पुलवामा मधे झालेल्या आतंकवादी आत्मघाती हमल्यात आर्मी चे ४० जवान शहीद झाले.

       सर्व विर जवानाना भावपूर्ण श्रद्धांजली...!!

✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
लाख बार सर झुकाऊँगा उनकी शहादत मे...
जो शहीद हो गये हमारी हिफ़ाज़त मे...||


कश्मीर मे शहीद नौजवानो को श्रद्धांजलि...

    🇮🇳🇮🇳||  जय हिंद  ||🇮🇳🇮🇳

✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
🇮🇳🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 🇮🇳

वतन से महोब्बत वो इस कदर निभा गए...
महोब्बत के दिन ही वतन पे जान लुटा गये...||

     🙏🏻शहीद जवान अमर रहे🙏🏻
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

🙏आज माफ करना प्रभुवर मेरे..
 आज कोई फूल नही तेरे चरणो मे चढ़ाने को....

  आज हर बगिया का हर फूलआतुर है..
शहीदो के शव पर चढ़ जाने को...||🙏

✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
भारतमातेच्या वीरांना
नमन करूया चला...
धन्यधन्य ती भारतमाता
उदरी शूर निपजला...!!
  ★☆◐◑★☆◐◆◑☆★◐◑☆★

निधड्या छातीवर झेलून गोळ्या
पत्करले मरण वीराचे...
नाही केली तमा जीवाची
संरक्षण केले भारतभूचे...!!
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

आता उगारू तलवार सूडाची
देऊ उत्तर सामर्थ्याने...
नकोच आता शत्रू पाकी
उधळून टाकू डाव धीराने...!!
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

पाहूनी अश्रू,अन् वेदना
पेटत आहे आग सूडाची...
मनात वाटे ठेचून टाकू
मुंडी पाकी सैतानाची...!!
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

व्यर्थ आता जाणार नाही
बलीदान माझ्या या भावांचे...
शस्त्र घेऊनी शिकवू धडा
मोल जानू तुझ्या रक्ताचे...!!
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

शहीदांची गाथा ही
हिंदुस्तानाने वाचावी...
इतिहासाच्या पानांवरती
सूवर्णाक्षराने लिहावी...!!


✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

माझ्या शहिद जवानांना ही १ कविता अर्पण.....

बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...

घायाळ जरी झालो तरी  
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...

लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या 
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे, 
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून, 
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई, 
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...

तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा ! 
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा 
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..

तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या 
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे 
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...

रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे 
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता 
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...

माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना 
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी 
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...

आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे

आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस, 
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.
                                           
   ~ ARMY~ 😪💥😪😪
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

 🙏🏻 शहीद जवान अमर रहे 🙏🏻

निशब्द झाल्या जाणिवा
थिजून गेले शब्द
याच नेत्रांनी पाहीले 
माझ्या शुरांचे रक्त
असा आज खंत करत राहीलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो...

फडताळातील बंदूक 
जर खोटी नसती
पहिली गोळी आज 
मिच झाडली असती
लाहोरमधली होळी आज खेळून आलो असतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो...

 न जाऊ दिले असते
शुरांचे बलिदान व्यर्थ 
असा घडवला असता 
शिवबा शब्दाचा अर्थ
दुर्दैवाने आज विलाप करीत बसलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो...

प्रेमाची अनं त्यागाची फुले
आज अश्रूंची झाली
त्याच फुलांनी आज
 श्रद्धांजली वाहिली
मनातून आज चडफडत राहिलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो...

शब्द आले थांबा सर , हरू नका
करू नका तुम्ही खंत
सिमेवर अजूनही लढतो आहे
तुमचा  विद्यार्थी शुर जातिवंत
फक्त एकच सैनिक घडला असता 
जर तुम्ही गुरूजी ऐवजी सैनिक झाला असता...

 जशास तसे, शिकवन तुमची
आहे आमीच्या ठायी
बलिदान व्यर्थ   मित्रांचे 
आम्ही जाऊच देणार नाही 
आकाशातले हे तारे कसे घडले असते
जर तुम्ही गुरूजी ऐवजी सैनिक झाले असते...

उठलो मुला , जागा झालो 
कळले आज मर्म
लाख पेटल्या जाणिवा जरी
माणवता हाच खरा धर्म 
देशाची शकले करणाऱ्यांना तेजस्वी उत्तर देईन
इथून पुढे फक्त सैनिकच घडवत राहीन...
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
       !! माते !!

नको आसवे ढाळू
माते माझ्या साठी!
ती ही माता होती
लढलो मी जिच्यासाठी!

बघ जरी तू रडतेस
मी हसतो आहे!
देशासाठी बलिदान देऊन
तिरंग्यात सजतो आहे!

प्रेमदिवसाच्या  दिवशी
मी भूमातेसाठी शहिद झालो!
रक्ताचे फूल बनवून
मातेस अर्पित गेलो !

सांग तुझ्या सूनेला
विरांनी रडायचे नसते!
आसवांनीच ज्योत पेटवून
देश उजळायचा असते!

सावर आता माझ्या मुलांना
थोडा त्यांना धीर दे!
दुश्मनांचा खात्मा करण्यासाठी
त्यांच्या पंखानां बळ दे!

( पुलवामा मधे शहिद झालेल्या सर्व विरपुत्रांना समर्पित)
          ~✍ वैशाली गावंडे -कोल्हे

✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

No comments:

Post a Comment