मकर संक्रात व भूगोल दिन यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल होय. सध्या मानव व मानवाच्या सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा शास्त्रशुद्ध पणे ज्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो त्यास भूगोल असे म्हणतात.
भूगोल हा शब्द इंग्रजीतील GEOGRAPHY या शब्दाला पर्याय वापरला जातो. हा मूळ लॅटिन भाषेतील शब्द आहे . GEO म्हणजे पृथ्वी व GRAPHY म्हणजे वर्णन होय. सर्वसाधारणपणे पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल होय. सध्या मानव व मानवाच्या सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा शास्त्रशुद्ध पणे ज्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो त्यास भूगोल असे म्हणतात.
भूगोल या विषयाची व्याप्ती व महत्व वाढण्यामध्ये अनेक भूगोल शास्त्रज्ञांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामध्ये इरेटोस्थेनिस, हम्बोल्ट, कार्ल रिटर, कुमारी अॅलन सेंम्पल, ब्लाश, रॅटझेल इ.
भूगोलाचा अभ्यास प्रामुख्याने दोन शाखांमध्ये केला जातो. एक प्राकृतिक भूगोल(Physical Geography) व दुसरी मानवी भूगोल(Human Geography) सामान्यता प्राकृतिक भूगोल बदलला की मानवी भूगोल ही बदलतो. म्हणजेच मानवी भूगोल हा पूर्णपणे प्राकृतिक भूगोल यावर अवलंबून असतो. म्हणजेच मानवी भूगोलावर ऊन वारा पाऊस माती या सर्व प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो तसेच त्या प्राकृतिक घटकांचा जैविक घटकावर ही मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो.
प्राकृतिक भूगोलात भूरूपशास्त्र(GEOMORPHOLOGY), हवामान शास्त्र (CLIMATOLOGY), मृदा भूगोल (PEDOLOGY), जैविक भूगोल (BIOGRAPHY), व सागर शास्त्र भूगोल(OCEANOGRAPHY) यांचा अभ्यास केला जातो. तर मानवी भूगोलात आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल,सामाजिक भूगोल,नागरी भूगोल, लोकसंख्याशास्त्र विषय भूगोल इत्यादी शाखांचा अभ्यास केला जातो.
याशिवाय ज्योतिष विषय भूगोल , गणितीय भूगोल,सैनिकी भूगोल, मेडिकल जॉग्रफि व नकाशा विषय भूगोल यांचाही अभ्यास केला जातो.
तसेच संख्याशास्त्र,जीआयएस, जीपीएस,रिमोट सेन्सिंग यासारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे भूगोल शास्त्राच्या अभ्यासात मोठ्या प्रमाणात गती आलेली आहे.
पृथ्वीचे सूर्य सन्मुख आणि विन्मुख होणे पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे सूर्याचे उत्तर व दक्षिण दिशेकडे होणारे भासमान चलन म्हणजे उत्तरायण व दक्षिणायन होय. पृथ्वीच्या आसाचा तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी होणारा कोन 66.5 अंशाचा आहे. याचाच अर्थ पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या संदर्भात 23.5 अंशानी झुकलेला आहे. पृथ्वीच्या तिरप्या आसामुळे पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करताना वर्षातील सहा महिने पृथ्वीचा उत्तर गोलार्ध तर सहा महिने दक्षिण गोलार्ध सूर्यासमोर झुकलेला असतो. पृथ्वीच्या गोलार्धाचे हे सूर्यसन्मुख व विन्मुख होणे किंवा सूर्याच्या भासमान सरकण्याला "अयन' म्हणतात. दरवर्षी 22 डिसेंबरपासून सूर्य मकरवृत्तावरून उत्तरेकडे सरकू लागतो. तो 22 मार्च रोजी विषुववृत्तावर पोचून तसाच उत्तरेकडे सरकत 21 जून रोजी कर्कवृत्तावर पोचतो. या दिवशी सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय. आपला भारत देश उत्तर गोलार्धातच वसलेला आहे. दिनांक 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत सूर्य रोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकतो. या कालावधीस "उत्तरायण' असे म्हणतात.
भूगोल दिनाचे महत्त्व
तारखेनुसार उत्तरायणाची सुरुवात 22 डिसेंबर रोजी असली तरी भारतीय तिथीनुसार ती पौष महिन्यात म्हणजे जानेवारीत होते. तसेच 14 जानेवारी रोजी येणाऱ्या मकरसंक्रांतीतील सूर्य धनू राशीतून मकरराशीत प्रवेश करतो. सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काळ साधारणपणे एक महिना असतो. अशा बारा राशीतून बारा महिने त्याचा प्रवास सुरू असतो. 14 जानेवारी रोजी होणाऱ्या मकरसंक्रमणात सूर्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते. *म्हणून हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.*
~प्रा.आनंदा शिवाजी आलदर
◆ सांगोला जिल्हा सोलापूर
Influx
ReplyDeleteInfotech Developed All in One School Management
Software with Unique Features including more
than 15 Excellent Modules with Two different
Mobile Android Applications. Call us for Online
Demo +91-8909248671, 7900221133.