"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

September 15, 2024

महामहीम द्रौपदी मुरूमु संघर्ष जीवनाचा...

 

सत्यघटना... 

    मॅडम सौ. राणी सोयामोई कॉलेज मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या .

    त्यांच्या अंगावर हातातील घड्याळाशिवाय दुसरं कुठल ही आभूषण दिसत नव्हत. इतकंच काय तर विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आश्चर्य याच वाटल की , त्यांनी तोंडाला पावडर सुद्धा चोपडलेली नव्हती.

    भाषण इंग्रजीत होत .त्या फक्त जास्तीत जास्त पाच मिनिट बोलल्या असतील पण त्या पाच मिनिटाच्या भाषणातील शब्द हे समाजात अंजन लावणारे आणि दृढ संकल्पाने भरलेले होते. 

इतक्यात विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.

प्रश्न - मॅडम आपलं नाव काय आहे ? 

     माझं नाव राणी आहे .सोयमोई , हे माझं कुटुंबातील नाव आणि मी उडीसातील मूळ निवासी आहे....अजुन काही विचारायचं आहे ? 

   विद्यार्थ्यांमधील एक हाडकुळी , बारीक मुलगी उभी ठाकली .

" विचार , बाळा?" 

" मॅडम , तुम्ही "मेकअप" का नाही करत ? 

     मॅडमचा चेहरा अचानक पिवळा पडला होता .त्यांच्या माथ्यावर घामाचे दव जमा झाले होते. चेहऱ्यावर असलेलं हास्य अचानक नाहीस झालं होत.समोर बसून असलेले विद्यार्थी एकटक मॅडमकडे पाहत होते. 

     त्यांनी शेजारी टेबलावर ठेवून असलेली पाण्याची बाटली उघडली आणि तोंडाला लावली . एक नजर पुढ्यात बसून असलेल्या विद्यार्थ्यावर फिरवली आणि प्रश्न विचारलेल्या मुलीला हाताने बसण्याचा इशारा केला .

यावेळी मॅडम नम्रपणे बोलू लागल्या .

    " मला भेडसावून आणि काळजीत टाकणारा प्रश्न. विचारला आहेस बाळा तू .. हा असा प्रश्न आहे , ज्याचं उत्तर एका शब्दात देणं कठीण आहे . उत्तरात तुम्हाला माझ्या आयुष्याची कथा ऐकवावी लागेल. मला सांगा,  काय तुम्ही माझी गाथा ऐकण्यासाठी तुमच्या आयुष्यातील दहा मिनिटे देण्यास तयार आहात ? " 

" हो...हो....तयार आहे .." 


" माझा जन्म उडीसा राज्यातील एका आदिवासी कुटुंबात  झाला होता."

     शेजारी बसून असलेला कलेक्टर अचानक कान टवकारून एक नजर बोलत असलेल्या मॅडमवर टाकी तर दुसरी नजर क्षणातच पुढ्यात बसून असलेल्या विद्यार्थ्यावर..!!


    " होय , माझा जन्म कोडरमा जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात, झोपडीमध्ये झाला होता.ज्याच्या आसपास " मिका " नावाची खदान आहे .माझे आईवडील दिवसभर खदाणीत काम करून राबायचे .मला दोन मोठे भाऊ आणि एक लहान बहीण होती.आम्ही एका लहानशा झोपडीत राहायचो,  ज्यातून पाऊस आल्यावर थेंबे टपकत असायचे.आईवडील दोघेही खदाणीत काम करायचे परंतु पगार तितका पूर्ण कुटुंबाला पुरेसा नव्हता .त्यांना दुसरं काम ही मिळत नव्हत . खदानित काम करणं म्हणजे खूपच कष्टदायी , मेहनत आणि खालच्या दर्जाच काम !!! 


"चार वर्षाची असेन मी तेव्हा , माझे आई , वडील आणि दोन्ही भाऊ अनेक आजारांच्या तोंडात सापडले होते .त्यावेळी त्यांना हे ठाऊक नव्हत की , त्यातील एक आजार त्यांना खदानित काम करत असताना , जी धूळ उडते , त्या धुळीच्या कारणाने होत आलेला होता .


     त्यानंतर पुढच्या एका वर्षात माझ्या दोन्ही भावांना देवाने बोलावून घेतल ."

शेजारी बसून असलेल्या कलेक्टरने पुन्हा एक नजर इकडे तिकडे फिरवली आणि हळूच खिशातील रुमाल काढून आपल्या डोळ्यांवर फिरवला.


    "त्यावेळी खूपदा आमच्या नशिबी साधं पाणी आणि एक दोन भाकरी बस ..इतकंच जेवण नशिबी असायचं .माझे दोन्ही भाऊ गंभीर आजार आणि भुकेपायी या जगातून चालते झाले होते .माझ्या गावात डॉक्टर तर सोडाच , शाळा सुद्धा नव्हती .काय तुम्ही अश्या गावाची कल्पना करू शकता , ज्या गावात डॉक्टर, शाळाच काय वीज आणि शौचालय सुद्धा नसेल ?" 


    एके दिवशी वडिलांनी भुकेपायी हड्डीला चिकटून असलेली चामडी सो कॉल्ड कुपोषित झालेला माझा हात पकडला आणि मला पत्र्यांच काम चालू असलेल्या खदानित घेऊन गेले .ही एका अभ्रकाची खदान होती , ज्या खदानीच दिवसेंदिवस नाव खराब होत चाललं होत. एक मोठी खदान होती ती !खूपच प्राचीन खदान, जी खोदून खोदून अगदी पाताळात जाऊन पोहचली होती  माझं काम त्या अंतरहिन खोल खदानीत जाऊन त्यातील भुयारी मार्गात असलेले अभ्रकाचे तुकडे जमा करून एका ठिकाणी ढीग बनवायच होत .हे काम फक्त दहा वर्षाखालील मुलांसाठीच शक्य होत .


    आयुष्यात त्या दिवशी रात्री मी पहिल्यांदा पोटभरून जेवण केलं होत पण त्यादिवशी मला उलटी झाली . ज्यावेळी मला प्रथम श्रेणीत असायला हवं होत , मी अंधाऱ्या खोलीत अभ्रकाचे तुकडे गोळा करण्यात रममान झाले होते .तिथे मी त्या विषारी वायू श्र्वासरुपी आत घेऊ लागले होते. 

कधी कधी तर " भूस्खलन " होऊन लहान बालके त्यात मारल्या जात असायची आणि कधी कधी तर त्या विषारी वायू आत गेल्याने सुद्धा मुले मेलेली मी बघितल आहे ..ह्या साऱ्या आयुष्यातील घटना जणू सामान्य झाल्या होत्या  , तिथल्या लोकांना ...!

दिवसभर आठ तास काम करून , कमीतकमी एका वेळेचं पोटभरून जेवण मिळत असायचं .त्या दरम्यान मी भुकेपायी आणि विषारी वायू आत घेतल्याने अजूनच दुर्बल , कुपोषित आणि निर्लज्ज होऊन गेले होते. 


     एका वर्षानंतर माझी लहान बहीण सुद्धा खदानित काम करायला लागली .जस माझ्या वडिलांना आता कुठे बर वाटायला लागलं होत , मग काय ..वडील , आई , बहीण आणि मी....आम्ही सार कुटुंब खदानित काम करायला लागलो आणि वीणा जेवण करता आम्ही राहायला लागलो होतो..सवयच झाली होती आता...


     पण नियतीने पुन्हा डाव पालटला आणि नशिबाने आता दुसऱ्या पद्धतीने आमची परीक्षा घ्यायची ठरवलं . त्यादिवशी मला भयंकर ताप होता आणि मी कामाला जाऊ शकले नव्हते . अचानक जोरजोरात पाऊस सुरू झाला .. खदानित काम करत असलेले हजारो श्रमिक वर्ग अंगावर खदान कोसळल्याने मृत्युमुखी पडले ..त्यात माझे वडील , आई आणि बहिण सुद्धा होते.


    मॅडमच्या दोन्ही डोळ्यांतून नद्यांचा उगम झाला होता . अश्रू अनावर आले होते . शेजारी बसून असलेले मंडळी तथा पुढ्यात बसलेले विद्यार्थी जणू श्वास घेणं , विसरले असावेत ...बऱ्याच लोकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते. 


     " तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल , मी फक्त सहा वर्षाची होते , शेवटी मी सरकारी अधिपत्याखाली असलेल्या मंदिरात पोहचले .तिथेच मी शिकले . माझ्या पूर्ण गावातून शिकलेली मी पहिली मुलगी होते आणि शेवटी हि मॅडम आज तुमच्या समोर उभी आहे . " 


    " तुम्ही विचारात पडला असाल की याचा आणि त्याचा काय संबंध ? बरोबर ना .....प्रश्न विचारला होता ना ...मेकअप का नाही करत ? " 

तिने पुन्हा एक नजर चारही बाजूंनी फिरवली .

    " शाळेत शिकत असताना मला जाणवलं की , लहानपणी अंधारात अभ्रक गोळा करण्याचं काम जे माझ्या नशिबी आल होत , त्याचाच उपयोग मेकअप उत्पादनांमध्ये केला जात आहे. अभ्रक हे पहिल्या श्रेणीतील मोतीसारखं  दिसणार सिलेकेट खनिज आहे .कित्येक मोठ्या कंपन्यांद्वारे दाखवल्या जाणाऱ्या खनिज मेकअपमद्ये तुमच्या त्वचेला जो सर्वात चमकदार रंग , बहुरंगी अभ्रकातून मिळत असतो .ज्या अभ्रकाला जवळपास वीस हजार बालके आपला जीव धोक्यात घालून जमा करत असतात .

गुलाबाच्या पाकळ्यासारखी कोमलता  त्यांची जळून गेलेली स्वप्ने , भटकंती जीवनमान आणि खदाणीत त्यांचं तुडवले गेलेले शरीर आणि रक्त तुमच्या गालांवर स्वार होत असत .

     खदाणीत मुलांच्या हातून उचलल्या गेलेल्या लाखो डॉलरच्या अभ्रकाचा उपयोग आजही केल्या जात आहे ...आपल्या सुंदर त्वचेला चमकवण्यासाठी!!! 

आता तुम्हीच सांगा ..

मी चेहऱ्याला मेकअप का करू ?


    स्वतः च्या भावांच्या आठवणीत पोटभरून कस जेवण करू ? जे भुकेपायी देवाघरी गेलेत . मी माझ्या आईच्या आठवणीत महागडे कपडे कसे अंगावर घालवून मिरवू , ज्या आईने कधी विचार ही केला नव्हता की , तिच्या नशिबात फाटलेल्या कपड्याव्यतिरिक्त काहीही तिला मिळालं नाही ."


   जेव्हा राणी मॅडम भाषण संपवून  चालत्या झाल्या , सारा दर्शक वर्ग अचानक उभा ठाकला .त्यांच्या ओठांवर हलकस स्मित तरळत होत .डोळ्यातील अश्रू न पुसता , त्यांची मान समोर ताठ होती .

काही वर्षानंतर ....

त्या मॅडम , भारत गणराज्य देशाच्या पहिल्या नागरिक बनल्या ...

महामहीम .... द्रौपदी मुरूमु....

भारत गणराज्य, राष्ट्रपती ....


No comments:

Post a Comment