"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

September 02, 2024

NDA - नॅशनल डिफेन्स अकॅडमी

  

    राष्ट्रीय संरक्षण अकादमी 

( NDA ) ही भारतीय सशस्त्र दलांची संयुक्त संरक्षण सेवा प्रशिक्षण संस्था आहे, जिथे भारतीय लष्कर , भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेचे कॅडेट पुढील प्री-कमिशनसाठी त्यांच्या संबंधित सेवा अकादमीत जाण्यापूर्वी एकत्र प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षण एनडीए खडकवासला, पुणे , महाराष्ट्र येथे आहे.

मुलींना  व मुलांना  कॅडेट म्हणून भरती होण्यासाठी आवश्यक संपूर्ण माहिती.

◆परिक्षा - वर्षातून दोन वेळा (पहीला रविवार एप्रिल आणि  सप्टेंबर)

◆सदर विषयी सर्व आवश्यक माहीती आपण या वेबसाईटवर पाहु शकता

 www.upsc.gov.in or nda

 ★ काही प्रमुख माहिती खालील प्रमाणे आहे....


●वय  - साडे सोळा ते साडे एकोणीस वर्षे असावे

●शिक्षण  - 12 वी पास या बारावी शिकत असताना अर्ज करु शकता

●मुलींना व  मुलांना कॅडेट साठी 12 बारावीतील विषय आवश्यक 

●आर्मी  -  कोणतेही विषय.

●एअर फोर्स  व नेव्ही   कॅडेट  -  फिजिक्स + केमिस्ट्री + गणित विषय आवश्यक

●12 वी मध्ये आवश्यक मार्क

50% आणि जास्त 


★आपल्या महाराष्ट्रात परीक्षा केंद्र★

◆पुणे,औरंगाबाद, नागपूर व मुंबई

◆परिक्षा पास झाल्यानंतर एस. एस.बी.  इंटरव्यू साठी काॅल लेटर येते.


★इंटरव्यू स्थळ -  आलाहाबाद, भोपाळ आणि बेंगललोर

◆इंटरव्यू पास झाल्यानंतर एनडीए मध्ये कॅडेट म्हणून रुजु  होतात

●रुजु झाल्यानंतर 03  वर्षे ट्रेनिंग असते. 

नंतर पासींग आऊट परेड...


     महाराष्ट्रातील खूप कमी तरुण भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून भरती होत आहेत. हि टक्केवारी वाढली पाहिजे त्यासाठी आपल्या सर्व तरुणांनी आपल्या सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

    आपल्या तरुणांना सैन्यदला मध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्यासाठी आपण सर्वजण मिळून आप आपल्या  माध्यमातून प्रेरित करू शकतो.

धन्यवाद जय हिंद 🙏


No comments:

Post a Comment