शैक्षणिक वर्ष 2025-2026 च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
नवीन शैक्षणिक सत्रासाठी माझ्या सर्व बाळगोपाळांच्या राज्यासह सर्वच क्षेत्राच्या संस्कारदूत, ज्ञानोपासक गुरुजन बंधु-भगिनींना सुहास्यवदनाने सुहृदयपूर्वक ज्ञानदान क्षेत्रातील यशदायी, सुदीर्घ यशवंत प्रवासास मनस्वी शुभचिंतन, शुभेच्छा...!
आज शाळेचा पहिला दिवस — नव्या सुरुवातीचा, नव्या उमेदिचा..!
आजचा दिवस प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष आहे. ही फक्त शाळा सुरू होण्याची तारीख नाही, तर नव्या स्वप्नांची, नव्या संकल्पांची आणि नव्या प्रवासाची सुरुवात आहे.
समाजातील बहुजनांचे शिक्षण अबाधित राहावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. अनेक आव्हानांवर मात करत, शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी शासनाच्या नवनवीन योजना व उपक्रम राबवले जात आहेत.
या वाटचालीत शारीरिक, मानसिक आणि सामाजिक संतुलन राखून आपण सर्वजण परिश्रम करत आहोत. आपल्या अथक मेहनतीमुळेच ज्ञानाचा दीप सतत प्रज्वलित राहतो.
🔴🔵
या नवीन वर्षात सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनःपूर्वक शुभेच्छा...!!
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासोबतच तुमचं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जाऊदेत! मेहनत, समर्पण आणि एकाग्रतेने तुमच्या ध्येयांची साधना करा...
शिक्षण हे तुमचं सामर्थ्य आहे आणि ते तुम्हाला आयुष्यातील सर्वोत्तम संधी देईल.
"कठीण समयामुळेच महानता साधता येते" हे लक्षात ठेवा, आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी पुढे चला...!!
तुम्ही शक्य ते सर्व काही साधू शकता!
नवीन ज्ञानाच्या वाटेवर तुम्ही यशस्वी व्हाल अशी आशा आहे...!!
उन्नती आणि उत्कर्षाचा विचार एकदा मनात आला की ध्येयाची बांधणी होते. ध्येयाला सातत्यपूर्ण कल्पक परिश्रमाची जोड मिळाली की, जीवनात भव्य यशाचा दिव्य सूर्योदय होतो.
आडवे आलेच कधी निराशा आणि अपेक्षाभंगांचे गतिरोधक तरी ते सहज पार करण्याच्या अंगवळणी पडलेल्या सवयीने-सहजतेने पार होऊन जातात. एकदा यशस्वीतेच्या अशा सात्विक आनंदाची गोडी निर्माण झाली की मग जीवनाच्या शाश्वत यशाचा राजमार्ग प्रशस्त होतो...
शैक्षणिक नवपर्वाची सुरुवात पुन्हा एक नवं चैतन्य, एक नवी ऊर्जा, एक नवा उत्साह... यासह सुरु होईल....
शाळा किलबिलाटाने गजबजून जातील. काही रुसलेले, काही फुललेले, तितकेच निरागस आणि निष्पाप भावनेचे प्रतिबिंब असलेले चेहरे, ती अजाण बालकं, आपल्या ठायी नतमस्तक होऊन विद्याग्रहणात लिन होतील...!!
अनेक प्रश्न, समस्या, अडचणींचे डोंगर प्रथम सत्रापासूनच आपणापुढे आहेत. त्यावर, अनंत गतिरोधक, खाचखळग्यांवर मात करून यशाचा सूर्योदय बघण्यासाठी तेजोमय भविष्याची एक छानशी सुरुवात सर्वांनी करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा...!!
No comments:
Post a Comment