"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

मराठी म्हणी व त्याचे अर्थ 3

01)  असेल तेंव्हा दिवाळी नसेल तेंव्हा शिमगा

  ★ अर्थ ::~  जवळ पैसा असतांना मागचा पुढचा विचार न करता तो पैसा चैनीत उधळायचा आणि मग पैसा संपला कि हाल अपेष्टा सहन करत बसावयाचे अशा वर्तनास हि म्हण वापरतात.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
02) उंदराला मांजर साक्ष

  ★ अर्थ ::~  भोळ्या मनुष्यास फसविण्यासाठी लुच्चा माणुस काही काळ त्याच्या मर्जीप्रमाणे वागुन विश्वास संपादन करतो म्हणजे मग आपले काम काढुन घेण्यास सोपे जाते. परंतु आपल्या संकटसमयी शत्रूचे सहाय्य घेणे हे परिणामी नाशाचे कारण ठरू शकते.

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
03)  अति रागा भीक मागा

  ★ अर्थ ::~  ज्याला अतोनात राग येतो किंवा ज्याचा राग अनावर असतो त्याला पुढे भीक मागण्याची पाळी येते. इथे भीक म्हणजे याचना समजावी, ती कशाही साठी असु शकते.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
04) दे रे हरी पलंगावरी

  ★ अर्थ ::~  काही लोकांना काहीच श्रम नं करता आपल्याला सगळं मिळावं असं वाटत असतं. कर्म नं करता फळाची आशा बाळगणे.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
05) आंधणातले रडतात आणि सुपातले हसतात

  ★ अर्थ ::~ तांदुळ जेंव्हा सुपात पाखडले जातात तेंव्हा आनंदाने उड्या मारतात पण मग तेच जेंव्हा शिजायला आंधणात जातात तेंव्हा रडतात.तसेच मनुष्याचा आयुष्यात स्थित्यंतरे येत असतात. जी आज सुखात आहे त्यांना उद्या दु:खाची स्थिती येणे हे सृष्टी नियमाला अनुसरून आहे.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
06) अचाट खाणे अन मसणात जाणे

  ★ अर्थ ::~ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
07) शिंक्याचे तुटले बोक्याचे पिकले

  ★ अर्थ ::~ कोण्या माणसाची वस्तु\जिन्नस त्याला भोगायला न मिळता अकल्पितपणे काही श्रम न करता दुसऱ्याला भोगायला मिळणे.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
08) कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे

  ★ अर्थ ::~ पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
09) नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे

  ★ अर्थ ::~ सांगितलेल्या गोष्टी किंवा सुचना या कानाने ऐकुन त्या कानाने सोडून देणे.
अशा लोकांना वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना हवं तेच करतात.

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
10) गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता

  ★ अर्थ ::~ मुर्ख माणसाला कितीही समजावुन सांगितले तरी त्याचे मुर्खतेचे आचरण बदलत नाही.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
आणखी मराठी म्हणी व त्याचे अर्थ वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

1 comment: