"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*02/06/18 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 02/06/2018 ❂*
      *🔘 वार ~ शनिवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *02. जून :: शनिवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
          अधिक जेष्ठ कृ. ४
       तिथी : कृष्ण पक्ष चतुर्थी,
          नक्षत्र : पूर्वआषाढा,
      योग : शुक्ल, करण : बव,
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:12,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02. *खायला काळ भुईला भार –*
          *★ अर्थ ::~*
ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. *सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।*
             ⭐अर्थ ::~
 सर्व जग सत्यावर आधारलेले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

      🛡 *★02. जून★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १५३ वा (लीप वर्षातील १५४ वा) दिवस आहे.
★इटालीचा प्रजासत्ताक दिवस

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयाचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर
●१९९९ : भूतानमधे दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले.
●१९७९ : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
●१९५३ : इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिचा राज्यारोहण समारंभ झाला. इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखाचा राज्यारोहण समारंभ प्रथमच दूरचित्रवाणीद्वारे जगभर पाहिला गेला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५६ : मणीरत्‍नम – चित्रपट दिग्दर्शक
◆१९५५ : नंदन नीलेकणी – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक
◆१९४३ : इलियाराजा – गीतकार आणि संगीतकार
◆१८४० : थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९२ : डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक
●१९९० : सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते
●१९८८ : राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन
●१९७५ : देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02.  *❃❝ थांबतो तो संपतो ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊ-जाऊ म्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने....
रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला....
   इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला. 'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.
शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.''
म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?''
''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला.
म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.'' म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच् या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा!

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते;
त्याला कोणीच हरवू शकत नाही...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. *✿ शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■  हायड्रोफोन    ➜ पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

■  अ‍ॅमीटर     ➜ विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

■  अल्टीमीटर  ➜ समुद्रसपाटी पासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

■  अ‍ॅनिमोमीटर   ➜  वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

■  ऑडिओमीटर   ➜ ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02. *❒ नारायण मुरलीधर गुप्ते ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १ जून १८७२
●मृत्यू :~  ३० ऑगस्ट १९४७

   *नारायण मुरलीधर गुप्ते* ऊर्फ
            *कवी "बी"*
   
    हे मराठी कवी होते. त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत. त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.

    'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे.

     *💥 प्रकाशित काव्यसंग्रह*
♦ फुलांची ओंजळ (१९३४)

          *💥 प्रसिद्ध कविता*
🔸चाफा (चाफा बोलेना, चाफा चालेना..)
🔹माझी कन्या (गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या...)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ शनिवार ~ 02/06/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment