"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*04/06/18 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 04/06/2018 ❂*
       *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *04. जून :: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
          अधिक जेष्ठ कृ. ५
       तिथी : कृष्ण पक्ष पंचमी,
             नक्षत्र : श्रावण,
      योग : एन्द्र, करण : तैतिल,
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:13,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

04. तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

04. *दुष्काळात तेरावा महिना*
    ★ अर्थ ::~ अडचणीत आणखी नव्या अडचणी ची भर पडणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

04. *उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि ।*
              ⭐अर्थ ::~
    उद्योगानेच कामे सिद्ध होतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 *★04. जून★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १५५ वा (लीप वर्षातील १५६ वा) दिवस आहे.
★विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : ’इन्सॅट-२डी’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेन्च गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
●१९९३ : आय. एन. एस. म्हैसुर या युद्धविनाशकेचे जलावतरण
●१८९६ : हेन्‍री फोर्डने तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे रस्त्यावर यशस्वी परीक्षण करण्यात आले.
●१६७४ : राज्याभिषेकापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकीलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४७ : अशोक सराफ – विनोदी अभिनेता
◆१९४६ : एस. पी. बालसुब्रम्हण्यम – दाक्षिणात्य चित्रपटातील गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार विजेते
●१९३६ : नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆१९४७ : पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

04.  *❃ कोल्हा आणि म्हातारी ❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एके दिवशी एक कोल्हा संध्याकाळी पक्ष्यांची शिकार करीत शेतातून चालला असता, जवळच कोंबडी मारून वनभोजन करीत बसलेल्या काही मुली त्याला दिसल्या.
        त्यांना तो म्हणाला, 'मुलींनो ह्या कोंबड्या तुम्हीच मारून खात आहात म्हणून ठीक, नाहीतर माझ्यासारख्या एखाद्या गरीब कोल्ह्याने जर ह्या कोंबड्या अशा मारून खाल्ल्या असत्या तर तुम्ही त्याच्यामागे शिकारी कुत्रे लावून त्याला पकडून त्याचा जीव घेतला असता.
         हे ऐकून जवळच एक म्हातारी बसली होती ती त्याला म्हणाली, 'अरे मूर्खा, आम्ही आमच्या स्वतःच्या कोंबड्या मारून खातो नि तू लोकांच्या कोंबड्या मारून खातोस, हा फरक जर तुझ्या लक्षात आला असता, तर तू हे बोलला नसतास !'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    *स्वतःच्या वस्तूची वाटेल तशी विल्हेवाट करण्याचा अधिकार प्रत्येकास आहे, पण दुसर्‍याची वस्तू चोरून तिची वाटेल ती व्यवस्था करण्याचा अधिकार कोणासही नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

04. *समजदार व्यक्तीसोबत*
*काही मिनीट केलेली चर्चा*
*ही हजारो पुस्तके वाचन्यापेक्षा*
     *श्रेष्ठ आहे..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

04. *✿ शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■  स्टेथोस्कोप -    ➜हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

■  सेस्मोग्राफ -    ➜भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

■  फोटोमीटर     ➜ प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता

■  हायग्रोमीटर     ➜ हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

■  हायड्रोमीटर     ➜ द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

04. *❒ ♦बाजीप्रभू देशपांडे♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*बाजीप्रभू देशपांडे तांबड्या मातीतील रणमर्द ...!*

         ■ बाजी प्रभू देशपांडे ■
  हिरडस मावळातील सिंध गावाची फार मोठी आसामी.

    बापजादे नावाजलेले पैलवान ,घरची परंपराच मुळी कुस्तीची .गावात बाजींचा चारचौकी देशपांडे वाडा होता, त्या वाड्यात समृध्द घोड्यांची पागा होती. पागेच्या मागच्या बाजूला बाजींनी तालीम बांधली होती.

   शिवरायांनी मांडलेल्या स्वराज्याच्या खेळात बाजी सुध्दा सामील झाले होते,पण त्या आधी बाजी बांदल देशमुख सरकारांचे दिवान म्हणून होते,राजांनी रायरी सर करून फितूर चंद्रराव मोर्यांना ठार केले तेव्हा त्यांना बाजीप्रभू  देशपांडे हे सोन सापडलं, पण बाजी मनोमनी म्हणत असत कि राजे  हे सोन आधी मातीमोल होत..
तुमचा स्पर्श झाला आणि जीवनाचे सोने झाले. राजाना  तर रायरी जिंकल्यापेक्षा  'बाजी'मिळाल्याचा आनंद झाला होता..!!
बाजी स्वत पहाटे  ३ वा. उठत असत. पूर्वीचे लोक भल्या पहाटे आपला दिवस सुरु करत असे म्हणजे दिवसभराच्या कामाला जास्त तास मिळत असे.

    पशुपक्षी बघा आपला दिवस कसा भल्या पहाटे सुरु करतात अगदी तसेच. बाजींच्या पदरी शूर धिप्पाड पैलवानांची फौज होती. सर्वजन कसलेले पैलवान होते.
सर्वच लढतीला उठत असत पहाटे...!
बाजींचे थोरले बंधू फुलाजी हे तर कुस्तीचे अतिशय व्यसनी.

   ३ तास लढत झाल्याशिवाय त्यांचे मनच भरत नसे..!! तर हे देशपांडे कुटुंब कुस्तीचे अतिशय नादिष्ट्य ..!!
बाजी स्वत लढत करत असत ,नंतर ५ हजार जोराचा ठेका एका दमात मारत असत ,तद्नंतर २ तास हात्यारांचा सराव.मग अंघोळ पाणी ..
तद्नंतर शंभू-भवानीची यथासांग पूजा झाली कि मग २ शेर तुपातील शिरा न्याहारीला यायचा.

    त्यानंतर  ५ शेर दुध पिउन मगच बाजी शिवरायांना भेटायला राजगडी रवाना होत असत...! एवढा प्रचंड व्यायाम, आणि खुराक ..?
    मग काय ..
बाजींचे काम काय लहान सहान होते ? अहो,त्यांच्या एका हाकेत बारा मावळ भगव्याखाली जमा होत होता ...
माणसासारखी माणसच काय पण हत्ती घोडे सुध्दा त्याना वचकून असत..!सकाळचा व्यायाम, खुराक, पूजा झाली आणि दिवसभराचे राजकारण संपवून सायंकाळी सुध्दा कुस्ती खेळल्याशिवाय अन्नाचा कण मुखात जात नसे..!

    आणि एके दिवशी ६ महिने सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकलेल्या राजांनी तांबड्या मातीत रंगलेली बाजींची फौज घेवून सिद्दीच्या वेढ्याबाहेर उडी मारली ..! आणि रक्ताची रंगपंचमी खेळून बाजींनी राजांना सहीसलामत वेढ्याबाहेर काढले..  ८ तास चिखल वाटेने , भर पावसात धावत येवून आणि पुढे ६ तास लढून .

   बाजी-फुलाजी या सख्या भावांनी राजांसाठी, मायभूसाठी स्वत:च्या  चाळण होऊन सुध्दा ती खिंड सोडली नव्हती... ती तारीख 12 जुलै 1660 होती.

*तोफेंचे बार ऐकूनच तो देह ठेवला..*
*हि रग, हि जिद्द, हि तळमळ, हि रक्ताची उसळी..*
 
     हि मातृभूमीवर मरायची आग फक्त तांबडी मातीच देवू शकते..
त्याचसाठी हा आजच लेख....!
हे जे बाजी-फुलाजी किंवा अन्य मराठेशाहीचे असे मरायला तयार होत होते हि खरी शिवरायांच्या कार्याची पावती आहे. शिवछत्रपती जर खरे ओळखायचे असतील तर या नरवीरांच्या बलिदानातून ओळखावे.

    कोण तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही, तर कोणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो.
कोणं मृत्युच्या पालखीत हासत हासत बसतो. तर कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंथरुणात झोपतो..!
यांचे हे असामान्य बलिदान हि शिवराय करत असलेल्या महान कार्याची खरीखुरी पावतीच होय..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ सोमवार ~ 04/06/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment