"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*05/06/18 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 05/06/2018 ❂*
       *🔘 वार ~ मंगळवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *05. जून :: मंगळवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
          अधिक जेष्ठ कृ. ५
       तिथी : कृष्ण पक्ष षष्ठी,
            नक्षत्र : धनिष्ठा,
    योग : वैद्रुति, करण : वणीज,
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:13,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05. *नाव मोठे लक्षण खोटे*
      *★अर्थ ::~*  किर्ती मात्र मोठी, पण ती पहावी तर खोटेपणाची.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *सत्यं कण्ठस्य भूषणम् ।*
   ⭐अर्थ ::~ सत्य बोलणे हे गळ्यातील खरे आभूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

 🛡 *★05. जून★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक पर्यावरण दिन
★हा या वर्षातील १५६ वा (लीप वर्षातील १५७ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
●१९८० : भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
●१९७५ : सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९०८ : रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक
●१८८३ : जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ
●१८८१ : गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक.
●१८७९ : नारायण मल्हार जोशी – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक
●१७२३ : अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२००४ : रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष
◆१९९९ : राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले
◆१९७३ : माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक
◆१९५० : हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05.     *❃❝ सचोटी ❞❃*
     ━━═•●◆●★★●◆●•═━━
    एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’’

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  ज्ञान सचोटीने प्राप्त होते धमकावून नव्हे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. जे आजवर तुमच्याकडे
   काहीच नव्हतं...
अस काही तुम्हाला हवे आहे...
 मग आजवर जे काहीच केले नाही.. अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *✿ टेकडीचे नाव व जिल्हा ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■. *घाटकोपर*    ➜ मुंबई उपनगर

■. *मलबार*     ➜ मुंबई शहर

■. *नेकनूर*     ➜  बीड

■. *पिपरडोल*    ➜ नागपुर

■. *मुदखेड*     ➜  नांदेड
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05. *❒ हिंद केसरी मारुती माने ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     हिंदकेसरी मारुती माने यांचा जन्म कवठे पिरानसारख्या लहान खेडयात अगदी गरीब कुटूंबात झाला. उंचपुरा देह, भरदार शरीर पाणीदार डोळे, गोरा रंग असे छाप पडणारे व्याक्तीमत्वं
छोटया वयापासून त्यांनी कुस्तीचा ध्यास घेतला आणि वडिलांकडून खेळाचा श्रीगणेशा गिरवला.
परिस्थिती बिकट असूनही वडिलांनी त्यांना खुराख कमी पडू दिला नाही.
कुस्तीचा आखाडा हेच भाऊचे खरे घर बनले. त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल म्हयणून ख्याकती मिळवली.

      सन 1960 ते 1972 हा त्यांचा नामवंत मल्ल म्हणून बहारीचा काळ होता. बैची मोट ओढणारे माने अशी त्यांची ख्याचती होती. मारुती माने आणि विष्णुपंत सावर्डेकर यांची कोल्हापूरत झालेली कुस्ती प्रचंड गाजली होती त्यांनी अनेक मोठमोठया कुस्या जिंकल्यां.
अखिल भारतीय हिंद केसरी हा मानाचा किताब मिळाला
ध्यनचंद पुरस्कामराने त्‍यांना गौरविण्यात आले.
त्यांनी कष्टा्तून जागतिक स्तरावरचा पैलवान होण्याची जिदद बाळगली व पूर्ण केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ मंगळवार ~ 05/06/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment