*06/06/18 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 06/06/2018 ❂*
*🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *06. जून :: बुधवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
अधिक जेष्ठ कृ. ७
तिथी : कृष्ण पक्ष सप्तमी,
नक्षत्र : शतभिषा,
योग : विश्कुंभ, करण : बव,
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:14,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. कुणाचेही अंतःकरण न दुखवता बोलणे म्हणजे खरे भाषण !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
06. *नाव मोठे लक्षण खोटे –*
*★ अर्थ ::~*
कीर्ती मोठी पण कृती छोटी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. *विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।*
⭐अर्थ :: ~
विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★06. जून ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक रशियन भाषा दिन
★हा या वर्षातील १५७ वा (लीप वर्षातील १५८ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७० : इंग्लंडमधे सी. हेन्केल या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
●१९६९ : वि. स. पागे समितीने केलेल्या शिफारशीवरुन रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली. १९७२ च्या भीषण दुष्काळात तिचे ’रोजगार हमी योजना’ असे नामकरण करण्यात आले.
●१८८२ : अरबी समुद्रात आलेल्या एका भीषण चक्रीवादळामुळे मुंबईत सुमारे १,००,००० लोक मृत्यूमुखी पडले.
●१६७४ : रायगड येथे छ्त्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक झाला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२९ : सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री
◆१९०९ : गणेश रंगो भिडे – मराठी ज्ञानकोशकार
◆१८५० : कार्ल ब्राऊन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : शांता शेळके – शब्दांवर मनापासून प्रेम करणार्या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका.
●१९७६ : जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी
●१९५७ : रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
06. *❃❝ मांजर व उंदीर ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एकदा मांजरे व उंदीर यांची लढाई फार दिवस चालली होती. त्यात प्रत्येक वेळी उंदराचा पराभव होऊन त्यांना पळून जावे लागले.
एकदा सगळे उंदीर जमून पराभवाचे कारण काय याचा विचार करीत असता त्यांना असे समजले की आयत्या वेळी आपला सेनापती कोण आहे हे आपल्या सैन्याला ओळखता येत नसल्याने पराभव होतो.
तेव्हा सेनापती कोण आहे हे ओळखता येण्यासाठी त्याने काहीतरी चिन्ह धारण करावे असे ठरले. प्रत्येक सेनापतीने आपल्या डोक्यावर गवताची लहान मोळी बांधावी असे ठरले. त्याप्रमाणे केले गेले.
नंतर सगळे सेनापती सैन्यासह लढाईवर गेले. पण मांजरांपुढे उंदराचे काय चालणार ? पराभव होऊन ते सगळे पळत सुटले व जीव वाचविण्यासाठी बिळात शिरले.
अशा प्रकारे शिपायांनी स्वतःचा जीव वाचवला पण सेनापतीची स्थिती फार वाईट झाली. त्यांच्या कपाळावर गवत बांधलेले असल्यामुळे त्यांना बिळात शिरता येईना व शेवटी ते सगळे मांजरांच्या भक्ष्यस्थानी पडले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
मोठेपणाबरोबर माणसाची जबाबदारी व संकटे वाढतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. घर्षण केल्याशिवाय
रत्न उजळतनाही...
त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. *✿ शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ बॅरोमीटर ➜ हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
■ बॅरोग्राफ ➜ हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
■ मायक्रोस्कोप ➜ सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
■ लॅक्टोमीटर ➜ दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
■ स्फिग्मोमॅनोमीटर ➜ रक्तदाब मोजण्याचे साधन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
06. *❒ शांता शेळके ❒*
━━═•●◆●★●◆●•═━━
●जन्म :~ १२ ऑक्टोबर १९२२
●मृत्यू :~ ६ जून २००२
ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविदयालयात पुढील शिक्षण घेतले. तेथे श्री. म. माटे, के. ना. वाटवे हे प्राध्यापक म्हणून त्यांना लाभले. याच सुमाराला प्रा. रा. श्री. जोग फर्ग्युसन महाविदयालयात आले. काव्यलेखनाबाबत त्यांचे त्यांना मार्गदर्शन व उत्तेजन मिळाले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले (१९४४). त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुगसाप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविदयालयांतून मराठीचे अध्यापन केले. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, चित्रपटगीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले; तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून त्या विशेष प्रसिद्घ आहेत.
वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्या नंतर काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रसिद्घ झाले. त्यांनी विपुल बालकथा, बालगीतेही लिहिली (थुई थुई नाच मोरा, १९६१; टिप् टिप् चांदणी, १९६६; झोपेचा गाव, १९९०).
गीतांचे इतरही अनेक प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. उदा., लावण्या, कोळीगीते. मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे. नादलयींचे नेमके भान जपणारी सुभग, प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्यलेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात.
मुक्ता आणि इतर गोष्टी (१९४४) हा त्यांचा पहिला कथासंग्रह; स्वप्नतरंग (१९४५) ही त्यांची पहिली कादंबरी; तर शब्दांच्या दुनियेत (१९५९) हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. त्यांत कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी केलेला अनुवाद (१९९४) अंतर्भूत होतो. ‘हायकू’ ह्या जपानी काव्यप्रकारातही त्यांना स्वारस्य निर्माण झाल्यामुळे त्यांनी ‘हायकू’ ह्या प्रकारातील काही कविता मराठीत आणल्या. ह्यांखेरीज काही इंग्रजी कादंबऱ्यांचे त्यांनी अनुवाद केले. अल्कॉट यांच्या लिट्ल विमेन ह्या कादंबरीचा त्यांनीचौघीजणी (१९६०) ह्या नावाने केलेल्या अनुवादाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गाजलेल्या विदेशी चित्रपटांच्या त्यांनी मराठीत निवेदिलेल्या कथांचेही संग्रह लोकप्रिय झाले.
त्यांच्या दीर्घ लेखन-कारकीर्दीत मराठी साहित्यनिर्मिती व साहित्यविचार ह्यांत अनेक स्थित्यंतरे झाली आणि त्यांच्या अनुषंगाने वादविवादही झाले; तथापि कोणत्याही पक्षाची वा पंथाची बाजू घेऊन त्यात न गुंतता आस्वादक आणि स्वागतशील वृत्तीने त्या ह्या सर्व स्थित्यंतरांना सामोऱ्या गेल्या. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. ह्यांखेरीज फाय फाउंडेशन; मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘वाक्विलास’; यशवंतराव चव्हाण; गदिमा; सु. ल. गद्रे इ. अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभले. त्यांच्या चिमणचारा, कविता करणारा कावळा, गोंदण इ. गंथांसही महाराष्ट्र शासनाचे वाङ्मयीन पुरस्कार मिळाले.
६ जून २००२ रोजी ७९व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ बुधवार ~ 06/06/2018 ◆*

No comments:
Post a Comment