"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 08. ऑगस्ट ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ भारत छोडो दिन
★ हा या वर्षातील २२० वा (लीप वर्षातील २२१ वा) दिवस आहे.

                      ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                   🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००८ : चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●१९९८ : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
●१९९४ : पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय सुरू केले.
●१९८५ : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
●१९४२ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४० : दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू
◆१९३२ : दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक
◆१९२६ : शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. त्यांच्या अनेक कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे.
◆१९२५ : डॉ. वि. ग. भिडे – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार (१९७३ -  १९७५), पद्मश्री
◆१९१२ : बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी
◆१९१२ : तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज
◆१९०२ : पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : गजानन नरहर सरपोतदार – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
●१९९८ : डॉ. सुमती क्षेत्रमाडे – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार. त्यांनी चौदा कादंबर्‍या दोन नाटके व काही कथा लिहिल्या.
●१८९७ : व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment