*09/08/18 गुरुवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 09/08/2018 ❂*
*🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *09. ऑगस्ट :: गुरुवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
आषाढ कृ. १३
तिथी : कृष्ण पक्ष त्रयोदशी,
नक्षत्र : आर्द्रा,
योग : वज्र, करण : गर,
सूर्योदय : 06:17, सूर्यास्त : 19:10,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगुन लहान राहीलेले कधीही चांगले.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *इकडे आड़ तिकडे विहीर*
*★ अर्थ ::~*
दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *बुद्धिर्यस्य बलं तस्य ।*
⭐अर्थ ::~ ज्याच्याजवळ बुद्धी असते तो बलवान ठरतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★ 09. ऑगस्ट ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ ऑगस्ट क्रांतिदिन
★ हा या वर्षातील २२१ वा (लीप वर्षातील २२२ वा) दिवस आहे.
★ आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन
★ भारतीय ग्रंथालय दिन
★ भारत छोडो दिवस
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९३ : छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन
●१९४५ : अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर *’फॅटबॉय’* हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणो त्सर्गाचे परिणाम भोगावे लागले.
●१९४२ : ’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
●१९२५ : भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०९ : डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक
◆१८९० : ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.
◆१७५४ : पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी
*●१९०१ : विष्णूदास अमृत भावे –* मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने नाट्य कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *✸ हे राष्ट्र देवतांचे ✸*
●●●●●००००००●●●●●
हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रमायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *❂ जगाला प्रेम अर्पावे ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *❝ आईवडीलांचा आशीर्वाद ❞*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*जगात आईवडिलच सर्वात श्रेष्ठ असतात.* एका पित्याने अापल्या मुलीचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खूप चांगल्या प्रकारे तिचे शिक्षण केलं जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.
काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली आणि एका मल्टी नैशनल कंपनीचा सी.ई.ओ. झाली .उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा तिला कंपनीकडून प्रदान झाल्या होत्या.
एके दिवशी असाच तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला तिला मुलंही झाली. तिचा आता आपला सुखी परिवार बनला. वडील म्हातारे होत चालले होते. एक दिवस वडीलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिस मध्ये गेले. त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या व शानदार ऑफिसची अधिकारी बनलीय. तिच्या ऑफिसात हजारो कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत आहेत.
हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !
ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिन मध्ये गेले व तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले. आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की,
"या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगी स्मित हास्य करत आत्मविश्वासाने म्हणाली.
"माझ्याशिवाय कोण असू शकत बाबा ?"
वडीलांना तिच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती.
त्यांना विश्वास होता की त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल की,
" बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात ज्यांनी मला एवढ्या योग्यतेच बनवलं!"
या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले. पण न राहून त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारलं की, परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगी ह्या वेळेस म्हणाला की,
"बाबा, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती!"
वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले,
"अग,आताच तर तू स्वतःला जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतीस आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगते आहेस " ?
मुलगी हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलली ,
"बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता.
ज्या मुलीच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना ? हो की नाही बाबा " !
वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."
खरंच आहे की, ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते.
*आपल्या प्रगती व उन्नतिने जेव्हा जग जळत असते.*
*तेव्हा फक्त "आई-वडीलच"आपल्या प्रगतीवर खुश असतात.*
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
जोपर्यंत आईवडीलांचा आशीर्वाद आपल्यावर असतो तोपर्यंत या विश्वातील कोणीही आपले वाईट करु शकत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *गर्व करून कुठल्या नात्याला*
तोडण्यापेक्षा माफी
*मागून ती नाती जपा.*
कारण वेळ आल्यावर पैसा नाही
*तर, माणसंच साथ देतात..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *✿ सामान्य माहिती ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ _____ याच्याशी अधिकार कक्षांवरून झालेल्या वादामुळे लॉर्ड कर्झनने पदाचा राजीनामा दिला.
*::~ किचेनेर*
■ कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
*::~ नाबार्ड*
■ ठिकठिकाणी धर्मशाळा व रुग्णालये स्थपन करण्याचे कार्य कोणी केले .
*::~ गाडगे महाराज*
■ बेंटीकच्या काळात भारतीयांच्या नेमणुका उच्च पदांवर प्रामुख्याने _____ खात्यात करण्यात आल्या.
*::~ न्याय*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *❒ विष्णुदास भावे ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.
_*🐾यांची आज पुण्यतिथी*_🐾
_त्यानिमित्त त्यांना_
_*विनम्र अभिवादन..!!*_
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
जन्म नाव : विष्णुदास अमृतराव भावे
●जन्म :~ १८१९
*●मृत्यू :~ ९ ऑगस्ट १९०१*
●कार्यक्षेत्र :~ मराठी नाटक
_*विष्णुदास भावे*_
♦विष्णुदास भाव्यांचा जन्म सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी यांच्या पोटी झाला. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. ज्यांच्याकडून अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकेल अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला.
♦ विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.
_*पुरस्कार*_
🔶 विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी ' रंगभूमिदिना' दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. या पुरस्काराचे स्वरूप - मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते.
🔷 महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ही मुंबईतील संस्था वर्षातील उत्कृष्ट हिंदी नाट्यरचनेसाठी *विष्णुदास भावे* पुरस्कार देते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ गुरुवार ~ 09/08/2018 ◆*

No comments:
Post a Comment