"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 10. ऑगस्ट ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २२२ वा (लीप वर्षातील २२३ वा) दिवस आहे.

                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.
●१९९९ : ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ’डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर
●१९९० : मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६० : देवांग मेहता – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष
◆१८९४ : व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: २३ जून १९८०)
◆१८६० : पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक
◆१८५५ : ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक
◆१७५५ : नारायणराव पेशवा – ५ वापेशवा

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : नारायण पेडणेकर – कवी व नाट्यसमीक्षक
●१९९२ : लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते.
●१९८६ : जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ’महावीरचक्र’ मिळाले होते.
●१९८२ : मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली.
●१९४२ : हुतात्मा शिरीषकुमार (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

No comments:

Post a Comment