"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

10. एप्रिल

🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०० वा (लीप वर्षातील १०१ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५५ : योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.
●१९१२ : इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन ’टायटॅनिक’ जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.
●१८७५ : महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३१ : किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका
◆१९२७ : मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)
◆१९०७ : मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार
◆१९०१ : डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु
(मृत्यू: ३ मे १९७१)
◆१८८० : सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार,
◆१८४७ : जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्‍यांना देण्यात येणार्‍या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक
◆१७५५ : डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक
 (मृत्यू: २ जुलै १८४३)

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्‍न’
(जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)
●१९६५ : डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.
(जन्म: २७ डिसेंबर १८९८)
●१९४९ : बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे  अध्यक्ष
●१९३७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय.
●१८१३ : जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ
●१३१७ : संत गोरा कुंभार समाधिस्थ 

No comments:

Post a Comment