"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 12. मार्च ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ७१ वा (लीप वर्षातील ७२ वा) दिवस आहे.

                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला.
●१९९९ : सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
●१९९३ : मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी.
●१९९२ : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.
●१९३० : ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१३ : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४)
◆१९११ : दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर
◆१८९१ : ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते
◆१८२४ : गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक
●१९९९ : यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक
●१९४२ : रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक 

No comments:

Post a Comment