"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★17.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ४८ वा दिवस आहे.

                   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.
●१९६४ : अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
●१९३३ : अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होतॊ.
●१९२७ : ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

                      ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१८७४ : थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (मृत्यू: १९ जून १९५६)
●१८५४ : फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८६ : जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ
●१९७८ : पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी
●१८८३ : राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)
●१८८१ : लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर, समाजसेवक
●१६०० : सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्‍या जिओर्डानो ब्रुनो याला बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल  क्रूसावर बांधून जाळण्यात आले. 

No comments:

Post a Comment