"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *20. एप्रिल* 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ११० वा (लीप वर्षातील १११ वा) दिवस आहे.
     
              ~*★महत्त्वाच्या घटना★*~
            🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : राष्ट्रपती प्रणब मुकर्जी यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले:
●१९४६ : राष्ट्रसंघ (League of Nations) ही संस्था विसर्जित करण्यात आली. पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रुपांतर झाले.
●१९३९ : अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुट्टी देऊन साजरा करण्यात आला.
●१७७० : प्रसिद्ध दर्यावर्दी व सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

                ~*★जन्मदिवस / जयंती★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५० : चंद्राबाबू नायडू – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
◆१९१४ : गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक
◆१८९६ : ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते
◆१८८९ : अ‍ॅडॉल्फ हिटलर – बव्हेरियाच्या सरहद्दीवरील ब्रानाउ आम इन या गावी सकाळी साडे सहा वाजता नाझी हुकुमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जन्म झाला. तो आपल्या बापाच्या तिसऱ्या लग्नसंबंधापासून झालेला तिसरा मुलगा होता. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
◆१७४९ : मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.

                 ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
             🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : कमलाबाई कृष्णाजी ओगले – ’रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका
●१९६० : अमल ज्योती तथा ’पन्‍नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार
●१९३८ : ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली.
●१९१८ : कार्ल ब्राऊन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ 

No comments:

Post a Comment