"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 24. ऑगस्ट ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ युक्रेनचा स्वातंत्र्य दिन
★ हा या वर्षातील २३६ वा (लीप वर्षातील २३७ वा) दिवस आहे.

                        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                     🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९६६ : रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले
●१८९१ : थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.
●१६०८ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                       🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३२ : रावसाहेब गणपराव जाधव – मराठीतील व्यासंगी साहित्यसमीक्षक. 'महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा'चे तिसरे अध्यक्ष व 'मराठी विश्वकोशा'चे प्रमुख संपादक
◆१९२९ : यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते
◆१९०८ : शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)
◆१८८८ : बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त
◆१८८० : बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)
◆१८७२ : साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले.  त्यांची खुप साहित्यसंपदा आहे.

                      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू
●१९९३ : शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव,  भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१)
●१९२५ : सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक 

No comments:

Post a Comment