"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 30. ऑगस्ट ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २४२ वा (लीप वर्षातील २४३ वा) दिवस आहे.    

                       ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                     🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९७९ : सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटांएवढी ऊर्जा निर्माण करुन ’हॉवर्ड-कुमेन-मायकेल्स’ हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठबागावर आदळला. सूर्याच्या पृष्ठभागावर धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
●१९४५ : दुसरे महायुद्ध - ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातुन सुटका केली.
●१८३५ : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
●१५७४ : गुरू रामदास शिखांचे चौथे गुरू बनले.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३० : वॉरन बफे – अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर
◆१९२३ : शंकरदास केसरीलाल ऊर्फ ’शैलेन्द्र’ – गीतकार
◆१९०४ : नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण [१९६९]
◆१९०३ : भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक
◆१८८३ : जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ,
◆१८७१ : अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ
◆१८५० : काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक,
◆१५६९ : जहांगीर – ४ था मुघल सम्राट (मृत्यू: २८ आक्टोबर १६२७)

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆१९९८ : नरहर वामन तथा ’नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते
◆१९९४ : शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख
◆१९८१ : जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव
◆१९४७ : नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – त्यांची ‘चाफा बोलेना, चाफा चालेना ...‘ ही कविता खूप प्रसिद्ध आहे.
◆१७७३ : सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. 

No comments:

Post a Comment