━━═●✶✹★●★✹✶●═━━
विद्यालय हे मंदिर सुंदर
प्रयाग जणू हे प्रज्ञेचे
ज्ञान दिवाळी शोभा उजळी
प्रसन्न गुरु हे विद्येचे....
समता ममता त्याग बंधूता
सेवा गुण हे नित्य स्मरा
मातृभूमीच्या जयजयकारा
ज्ञान धनाची आस धरा...
इथे भारती ज्ञान आरती
उन्मेशाची अध्र्येफुले
अर्पित सजले विद्या मंदिर
मांगल्याची ज्योत जळे
भागिरथ होऊनी हिच प्रतिज्ञा
चैतन्याचा फूलवू मळा
देवी शारदा प्रसन्न होवो
हाच सापडे बोध खरा...।
खूपच सुंदर...Youtube जे नाही सापडलं ते इथे सापडले... मी शाळेत असताना ही प्रार्थना म्हणत असो...आज आठवण आली प्रार्थनेची म्हणून शोध घेत होत आणि इथे आलो..तुम्ही केलेला हा उपक्रम खरच खूप छान आहे...तुम्ही असच मराठी शाळेची सेवा करत रहा..तुमच्या या सेवेला माझा नमस्कार.
ReplyDeleteअतिशय सुंदला प्रार्थना आहे. आज कोरोना पार्श्वभूमिवर दीर्घ एकांतानंतर विद्यालये सुरू होत असतांना ही प्रार्थना कधी नव्हे तेवढी मनाला भिडते.
Deleteविद्यालय हे मंदिर सुंदर प्रयाग जणू हे प्रज्ञेचे !
Deleteज्ञान दिवाळी शोभा उजळी, प्रसन्न गृह हे विद्येचे !
समता ममता त्याग बंधुता, सेवा गुण हे नित्य स्मरा
अमृतत्वाच्या जयजयकारा ज्ञान धनाची कास धरा
इये भारती ज्ञान आरती, उन्मेषाची अर्घ्य फुले
अर्पित सजले विद्यामंदिर मांगल्याची ज्योत जळे
या वेदीवर अज्ञ तमाचा अहंपणाचा होम करू
स्फुर्ती दिप्तीला प्रेरक ऐशा कृतीने विद्यालय सजवू
भगीरथ होऊ हीच प्रतिज्ञा चैतन्याचा फूलवू मळा
देवी शारदा प्रसन्न होवो, साधकास ह्या तिचा लळा
…………………