"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

मदर तेरेसा

  
 
    एक थोर मानवतावादी समाजसेविका
   या भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या.

 मदर तेरेसा चे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू.
   मदर तेरेसा या कॅथोलिक होत्या मात्र त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं होतं. भारतासह त्यांना अनेक देशांच नागरिकत्व मिळालं होतं. १९४६ मध्ये त्यांनी गरीब, असहाय लेकांची सेवा करण्याचं प्रण घेतलं. निस्वार्थ सेवाभावाने त्यांनी १९५० मध्ये कोलकातामध्ये 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ची स्थपना केली होती.

        *❒ मदर तेरेसा ❒*
     ━━═•●●★●●•═━━
★जन्म :~२६ ऑगस्ट,  १९१०, अल्बानिया
★स्मृती - ५ सप्टेंबर १९९७ (कोलकाता)   

६ जानेवारी १९२९ रोजी त्या भारतात आल्या. कोलकत्ता येथे दाखल होऊन लॉरेटो मिशनच्या ‘सेंट मेरी हायस्कूल’ मध्ये त्यांनी भूगोल शिकवण्यास सुरुवात केली. नंतर त्या पाटणा येथे आल्या. 'अमेरिकन मेडिकल मिशन’ मध्ये त्यांनी वैद्यकिय उपचार आणि परिचारिका यांचे प्राथमिक शिक्षण घेतले. मदर टेरेसा यांनी १९४८ साली कोलकत्ताच्या ‘मोतीझील’ या झोपडपट्टीत आपले सेवा कार्य सुरु केले. तेथे त्या रोगी, अपंग-अनाथांची प्रेमाणे सेवा करू लागल्या. अनाथ अपंग, गोर-गरीब यांच्या सेवेचे त्यांनी त्या वेळी घेतलेले खडतर व्रत शेवट पर्यंत हव्याहत चालू होते. मदर टेरेसा ख्रिश्चन मिशनरी असल्या तरी धर्म, पंथ, जात त्यांच्या जन सेवेच्या आड येत नव्हती. प्रत्येक मानवात त्यांना भगवान येशू दिसत होता. म्हणूनच जनसेवा हीच ईश सेवा आहे. असे समजूनच त्या समाज कार्य करीत होत्या. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर मग तो कोणत्याही धर्माचा असो, अपंग, गरीब, किंवा महारोगी असो, आबाल-वृद्ध स्री-पुरुष कोणीही असो त्यांच्या वर मदर टेरेसा प्रेम करीत होत्या व त्यांची सेवा करीत असत. प्रत्येकाला दिलासा, धीर, आधार, देऊन दुखीतांचे अश्रू पुसीत असत, म्हणूनच त्यांनी स्थापन केलेल्या ‘निर्मल हृद्य’ ‘शिशु भवन’ ‘महारोगी केंद्र’ या संस्था मधिल प्रत्येक व्यक्तीला मदर टेरेसा या आई प्रमाणे होत्या. 
       त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.

        ♦इ.स. १९७९ मध्ये त्यांना *‘नोबेल पुरस्कार’* मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना *‘भारतरत्न’* हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की आपल्याला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.

        ♦मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वत: युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला.
                      ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment