━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●मृत्यू :~ १३ ऑक्टोबर १९८७. मुंबई, महाराष्ट्र
🔸कार्यक्षेत्र :~ गायक, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार
🔹कारकीर्द :~ १९४६ - १९८७
*किशोर कुमार*
यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते.
अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ.स. १९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ.स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएँ क्यों मांगूँ". यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्याच संधी मिळाल्या.
किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एल्. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.
अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बर्याच नामांकित दिग्दर्शकां बरोबर काम केले आहे. बिमल रॉय बरोबर "नौकरी" आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" सलिल चौधरी, "नौकरी"चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोरचे गाणे ऐकून, त्यांनी हेमंत कुमारच्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.
प्रमुख चित्रपट चलतीका नाम गाडी, पडोसन, दिल्लीका ठग, नई दिल्ली, झुमरू, आशा, हाफ़ टिकट, श्रीमान फ़न्टूश. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँ" होता.
किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांनी जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायले आहेत. किशोर कुमार यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे त्यांचे लेखन करून त्यात संगीत दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. त्यांनी ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी २ अपूर्ण राहिले. त्यानी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले.
◆आणीबाणी आणि किशोरकुमार◆
इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी जाहीरपणे धिक्कार केला. त्याचा सूड म्हणून इंदिरा गांधी यांनी किशोरकुमार यांच्या मिळकतीवर आयकर खात्याकडून छापे मारायला सुरुवात केली. त्यांची गाणी आकाशवाणीवर वाजवू नयेत असे आदेश दिले. किशोर कुमार तुरुंगात जाता जाता वाचले असले तरी ते कफल्लक झाले. यावर उपाय म्हणून ते देशात आणि परदेशांत स्टेज शोज करू लागले. त्यांत त्यांना अपरंपार यश, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळाला. किशोर कुमार यांचे सर्व स्टेज शोज हाऊसफुल होत. आणीबाणी संपली तरी किशोर कुमार स्टेजवर येतच राहिले.
*१३ ऑक्टोबर १९८७ रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह अंत्यविधीसाठी खांडव्याला नेण्यात आला.*
◆ पुरस्कार ◆
🔷किशोर कुमार यांनी ८ वेळा फ़िल्मफेअर सर्वोतम पार्श्वगायकाचा मान मिळाला आहे.
No comments:
Post a Comment