"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 225

   *❒ नेताजी सुभाषचंद्र बोस ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ 23 जानेवारी 1897, कटक, ओडिशा,भारत
●मृत्यू :~ 18 ऑगस्ट 1945, तैहोको, तैवान

◆चळवळ :- भारतीय स्वातंत्र्यलढा
◆संघटना :- अखिल भारतीय काँग्रेस,फॉरवर्ड ब्लॉक,आझाद हिंद फौज.
◆आईचे नाव :- प्रभावती
◆वडिलांचे नाव :- जनकीनाथ
◆पत्नीचे नाव :- एमिली शेंकल

                  ★ संक्षिप्त माहिती ★
      हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यतील एक अग्रसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरु असताना इंग्रजांशी  लढण्यासाठी त्यानी जपानच्या मदतीने *आझाद हिंद फौज*  स्थापन केली. त्यानी  दिलेला *जय हिंद* चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.

        ★ शिक्षण व विद्यार्थी जीवन ★
   लहानपणी, सुभाष काटक मध्ये शिकत असताना त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास असे होते . ते आपल्या विद्यर्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुलिंग जागवत असत. त्यांनी सुभाषमधील देशभक्ती जागृत केली.
     वयाच्या १५ व्या वर्षी सुभाष  गुरूंच्या शोधात  हिमालयात गेले होते. गुरूचा शोध असफल राहिला . त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.
      १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले . परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.

    ★ स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य ★      
 रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम गांधीजींना भेटले व सुभाषबाबूंचा इच्छे नुसार दासबाबूंसोबत काम करण्याचा सल्ला दिला व पुढे दोघांनी बंगालमध्ये असहकार आंदोलनाचे नेतृत्व केले.

१९३८ साली हरिपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

१९३३ पासून १९३६ पर्यंत सुभाषबाबूंचे युरोपात वास्तव्य होते तेथे त्यांनी इतलीचे नेते  मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली व त्यांच्या कडून भारतीय स्वातंत्र्यत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वाचन घेतले.

           ★ पूर्व आशियात वास्तव्य★
    पूर्व आशियात पोचल्यानंतर सुभाषबाबूंनी सर्वप्रथम रासबिहारी बोस ह्यांच्याकडून  भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे सूत्र सिंगापूर मधील फेरर पार्कमध्ये आपल्या हाती घेतले
        पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून भारतीयांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे व आर्थिक मदत करण्याचे  आवाहन केली.

      ★ बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी ★
         १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.
       २३, ऑगस्ट१९४५ रोजी जपानच्या दोमेई खबर संस्थेने जगाला कळवले की १८ऑगस्ट च्या  दिवशी नेताजींचे विमान तैवानच्या  भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले होते.
~~~||||~~~||||~~~||||~~~
नेताजी सुभाषचंद्र बोस

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सदैवही
पुढाकार घेत आपले गमावले प्राण
नेताजी सुभाषचंद्रबोस बाबु उत्तम कामगिरीने जगामध्ये ठरले महान

तेवीसजानेवारी अठराशे सत्यानवं
रोजी कटक या शहरातची जन्मले
वडील जानकीनाथ अन प्रभावती
माता यांनी योग्य संस्कार घडविले

स्वामी विवेकानंदाचे साहित्य खुप
वाचुनिया कट्टर शिष्य स्वतः बनले
बालपणापासूनही सुप्त राष्ट्रभक्ती
जागृतीचे मनोबल गुरुनेच वाढवले
 
इंग्रज सरकारच्या असहकार या
आंदोलनातही ते सहभागी झाले
कोलकत्ता येथील रस्त्याची नावे
बदलून भारतीयांची नावच दिले

तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी
दुंगा असाच विश्वासपूर्ण नारा दिले
 जीवनात इतराना सुखी करुनिया
अकरा वेळा तुरुंगवाससदा भोगले

फॉरवर्ड ब्लॉक पक्ष एकोणविसशे एकोनचाळीस साली स्थापन केले
भारताचा इतिहासात अमुलाग्रची
लढा देत जनजागृतीचे कार्य केले

               ओंकार राठोड
         दारव्हा जिल्हा यवतमाळ

No comments:

Post a Comment