*❒ नामदेव धोंडो महानोर ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १६ सप्टेंबर १९४२
हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
महानोरांचा जन्म सप्टेंबर १६, इ.स. १९४२ रोजी महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेडे, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.
◆ राजकीय कारकीर्द ◆
महाराष्ट्र विधान परिषदेवर नियुक्त सभासद म्हणून महाराष्ट्र शासनाने महानोरांची शिफारस केल्यावर इ.स. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.
◆ पुरस्कार ◆
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९,
साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड'
No comments:
Post a Comment