*❒ एम. एस. सुब्बलक्ष्मी ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
कर्नाटक संगीतातील ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचा भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनी ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या मैफलीने सन्मान करण्यात येणार आहे.
सुब्बलक्ष्मी यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली असून त्यानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूतावासाने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
चेन्नईस्थित शंकरा नेत्रालय या संस्थेच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच 1966 मध्ये सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गायन सादरीकरणाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने राष्ट्रसंघातील सदस्यांसह जगाला मोहित करून टाकले होते.
एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावर आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी लाभणारे रेहमान हे दुसरे भारतीय संगीतकार आहेत.
No comments:
Post a Comment