"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 344

   *❒ लोकशाहीर अमर शेख ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      लोकशाहीर कॉ. अमर शेख यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान अतुलनीय होते. अतिशय धारदार आणि टिपेला पोहोचणाऱ्या त्यांच्या आवाजाचा व उंच तानेचा प्रभाव जनमानसावर पडत असे. गाण्याचा आशय व विचार तर ते लोकांपर्यंत टोकदारपणे पोहोचवायचेच, पण भावोत्कट गाणे हे त्यांचे वैशिष्टय़ होते.  सारा महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या व इतर वेळीही कामगार चळवळीची प्रेरणा ठरलेल्या या शाहिरी कलावंताचे  कोणत्याच स्तरावर या घटनेची  दखल घेतली गेली नाही. 

       मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी जो तीव्र संघर्ष मुंबई व महाराष्ट्रातील कामगार व सर्वसामान्य जनतेने केला त्या जनतेला या लढय़ात सामील होण्याची प्रेरणा देण्यात लोकशाहीर अमरशेख, त्यांचे कलापधक व शाहिरीचा सिंहाचा वाटा होता. कॉ. डांगे, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे यांच्या इतकेच या लढय़ात शाहिरांचे योगदान होते. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सारा महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या व इतर वेळीही कामगार चळवळीची प्रेरणा ठरलेल्या या शाहिरी कलावंतांकडे दुर्लक्षच झाले. कारण समाजाच्या संस्कृतीची सूत्रे हातात असणाऱ्या, साहित्य, कला व इतर प्रासारमाध्यमांवर नियंत्रण असणाऱ्या मध्यम व अभिजन वर्गाने सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय असणाऱ्या या शाहिरी कलेला दुय्यम मानले. प्रस्थापित साहित्य, कला क्षेत्रातील कुणा कलाकाराला लाभली नसेल एवढी अफाट लोकप्रियता या कलाकारांना लाभली. पण प्रस्थापित कला-साहित्याच्या मूल्यमापनाच्या निकषात ‘लोकप्रियता’ हा दुय्यमत्वाचा निकष मानला जातो. त्यामुळेही या कलाकारांची विशेष दखल घेतली गेली नाही.

No comments:

Post a Comment