"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 160

 *❒ ♦मायकेल फॅरेडे♦ ❒*
 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     *इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ*

●जन्म :~ २२ सप्टेंबर १७९१
●मृत्यू :~ २५ ऑगस्ट १८६७

                     ◆ मायकेल फॅरेडे ◆
     हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने विद्युतचुंबकत्व आणि विद्युत रसायनशास्त्र या विज्ञानाच्या शाखांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले.

       मायकेल फॅरेडे याचा जन्म सप्टेंबर २२, इ.स. १७९१ रोजी न्यूइंग्टन बट्स, सरे, इंग्लंड येथे झाला. घरच्या गरीब परिस्थितीमुळे फॅरेडे फक्त जुजबी शिक्षण घेऊ शकला व वयाच्या १४ व्या वर्षी त्याला एका पुस्तकाच्या दुकानात नोकरी पत्करावी लागली. या नोकरीच्या काळात त्याने दुकानात जुळवण्यासाठी आलेली पुस्तके भरपूर वाचून काढली. तो electric boy म्हणून ओळखला जातो. 

No comments:

Post a Comment