"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 166

 *❒ ♦प्रिया तेंडुलकर♦ ❒*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     मराठी चित्रपट अभिनेत्री प्रिया विजय तेंडुलकर

●जन्म :~ १९ ऑक्टोबर १९५४
●मृत्यू : ~ १९ सप्टेंबर  २००२
●कार्यक्षेत्र :~ अभिनय (चित्रपट, नाटक, टीव्ही); कथालेखन

                         ◆ प्रिया तेंडुलकर
    ह्या मराठी ललितलेखन करणार्‍या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.

    प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून देऊन त्या नाट्यसृष्टीमध्ये शिरल्या. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.

   प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्‍मेदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. 

No comments:

Post a Comment