━━═•●◆●★●◆●•═━━
●जन्म :~ २९ डिसेंबर १९४२
●मृत्यू :~ १८ जुलै २०१२
◆ राजेश खन्ना ◆
हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते होते. ह्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही काम केले आहे.
काकाने दत्तक घेतल्यानंतर राजेश खन्ना मुंबईत आले व शाळेत जाऊ लागले. त्यांनी महाविद्यालयातले स्नेहसंमेलन गाजविले. त्यातून ते चित्रपटाकडे वळले आणि मग हिंदी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार बनले. राजेश खन्ना यांनी एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली होती.
त्यांनी चित्रपटांत रंगविलेले प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरले. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या लोकांना आवडल्या. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते.
फिल्म फेअर पुरस्कार (१९७५) - उत्कृष्ट अभिनेता, फिल्म फेअर जीवन गौरव पुरस्कार (2005),
राजेश खन्ना यांना फिल्म फेअर पुरस्कारासाठी तब्बल १४ वेळा नामांकित करण्यात आले होते, त्यापैकी ३दा त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला.
राजेश खन्ना याचे ’एकमेव सुपरस्टार’ नावाचे मराठी चरित्र संजीव पाध्ये यांनी लिहिले आहे.
No comments:
Post a Comment