*❒ ♦विक्रम बत्रा♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
◆टोपणनाव :~ शेरशाह●जन्म :~ ९ सप्टेंबर, १९७४*
●मृत्यू :~ ७ जुलै, १९९९ (वय २४)
◆लढाया व युद्धे :~ कारगिल युद्ध
◆पुरस्कार :~ परमवीरचक्र
*★ कॅप्टन विक्रम बत्रा ★*
🔹हे भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते. ६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला. ते भारतीय स्थल सेनेतील १३ वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते.
*विक्रम बत्रा यांचे काही निवडक उद्गार*
🔸बत्रा यांचे युद्धभूमीवरील शेवटचे उद्गार होते - जय माता दी !
बत्रा यांचे पेप्सीचे घोषवाक्य ये दिल माँगे मोर ! भारतभर खूपच गाजले व हे वाक्य भारतीय देशभक्ती व वीरतेच्या अदम्य भावनेचे प्रतीक बनून राहिले व आजही आहे.
🔹विक्रम जेव्हा पॉइंट ५१४० ला पोहोचले तेव्हा शत्रू कमांडरशी झालेल्या रेडियो संभाषणात शत्रू कमांडर म्हणाला, तू का आला आहेस, शेर शहा? (शेर शहा हे विक्रम यांचे सैन्यातील टोपणनाव होय) तू आता मागे जाऊ शकत नाहीस. त्यावेळी विक्रम यांनी प्रत्युत्तर दिले, आपण एका तासात पाहूच, वरती (शिखरावर) कोण उरते.
🔸जखमी झालेल्या लेफ्टनंट नवनीत यांना सुरक्षित ठिकाणी आणताना लेफ्टनंट यांनी विक्रम यांच्यासमोर जखमी अवस्थेतही लढण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा विक्रम म्हणाले, तुमची बायकामुले घरी आहेत, त्यामुळे तुम्ही मागे हटा; मी आहे. बत्रा यांचे एक प्रसिद्ध वाक्य म्हणजे एकतर तिरंगा फडकवून येईन नाहीतर तिरंगा लपेटून येईन (शहीद होऊन) पण नक्की येईन.
🔹एका पाकिस्तान्याने एकदा असा टोमणा मारला की जर तुम्ही माधुरी दीक्षित आम्हाला दिलीत तर आम्ही काश्मिरमधून निघून जाऊ. त्यावर विक्रमनी त्याला एक गोळी घालून मारून टाकले व म्हणाले, फ्रॉम माधुरी, विथ लव्ह.
◆चित्रपटात कारगिल युद्ध◆
🔸२००३ साली प्रदर्शित झालेल्या एलओसी कारगिल या कारगिल युद्धावरील चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन याने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे
No comments:
Post a Comment