"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

मा. नरेंद्र मोदी

 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━


●जन्म :~ १७ सप्टेंबर, १९५०, वडनगर, मेहसाणा जिल्हा, गुजरात

           ◆ मा. नरेंद्र दामोदरदास मोदी◆
  भारताचे विद्यमान १५ वे पंतप्रधान, विकासपुरुष, नवभारताचे शिल्पकार  नेते मा. पंतप्रधान
 श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या  कोटी कोटी शुभेच्छा...!! 


   ♦हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि २६ मे  २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.

   🔶भाजपच्या गुजरात विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजप चे स्ट्रॅटेजिस्ट होते. मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. गुजरात च्या विकासासाठी मोदी ओळखले जातात.  त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते.

   🔶त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या पदावर पोहोचणारे रा. स्व. संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक ठरले.

   🔷मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. १९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. १९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली.

    ♦भारतीय जनता पक्षाचे जहाल नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा कुशाग्र बुद्धीचा व महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकतो, हे मोदींनीच दाखवून दिले.
या विकासपुरुषाचा राष्ट्रीय राजकारणाच्या पटावरील झपाट्याने झालेला उत्कर्ष अवाक करणारा आहे.

No comments:

Post a Comment