"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

यशवंतराव चव्हाण



लोकनेते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पुरोगामी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण..
     
●जन्म:~ १२ मार्च १९१३, कराड, महाराष्ट्र, भारत
●मृत्यू : ~ २५ नोव्हेंबर १९८४

           *यशवंतराव बळवंतराव चव्हाण* हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
      कार्यकाळ (१ मे १९६० ते १९  नोव्हें. १९६२)
   भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तर काही काळ ते भारताचे संरक्षण मंत्री सुध्दा होते.ज्यांनी लहानपणापासूनच यशवंताचा यशवंतराव होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली अश्या महान समाजसेवकाचा, प्रचंड मोठी महत्वकांक्षा असणाऱ्या राजकारन्याचा १२ मार्च जन्मदिवस आणि जन्मदिवसानिमित्त विनम्र अभिवादन...!!


    यशवंतराव चव्हाण यांचे 'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' असेही वर्णन केले जाते. नावातच "यश" आणि "यशवंत" असल्यामुळे त्यांना प्रारब्ध भाग्य आणि नशीब दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य केले. ते एक संयमी राजकारणी होते. राज्यात सहकार चळवळीपासून अनेक साखर कारखान्यांच्या स्थापनेसह कृषि , सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे.

    चव्हाण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या सक्रिय सहभागी होते . 1930 साली त्यांनी महात्मा त्यांनी स्वामी रामानंद भारती , भाऊराव , ( आप्पासाहेब ) आणि गोविंद वाणी संपर्कात आले या कालावधीत नेतृत्व नसलेल्या सहकार चळवळ त्याने सहभाग होते . मैत्री कायमचे तेथे खेळलेला . 1932 मध्ये सातारा मध्ये भारतीय ध्वज तुरुंगात 18 महिने शिक्षा ठोठावली होती.
   चव्हाण त्याच्या B.A. मिळवता 1938 मध्ये मुंबई विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्र मध्ये . या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये गुंतलेली होती आणि लक्षपूर्वक काँग्रेस पक्ष आणि जसे जवाहरलाल नेहरू , सरदार पटेल आणि केशवराव म्हणून त्याच्या नेते, संबद्ध होती . 1940 मध्ये सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बनले . 1941 मध्ये ते एल्.एल्.बि. पास झाले. 1942 साली त्यांनी जि सातारा मध्ये फलटण येथे वेनुताईशी लग्न केले.

   त्यांनी मुंबई सत्र येथे एक 1942 मध्ये त्या बाहेर येण्याची भारत साठी कॉल दिला आणि त्यानंतर चळवळ त्याने सहभाग अटक करण्यात आली होती. चव्हाण शेवटी 1944 मध्ये तुरुंगात मधून प्रसिद्ध झाले.

    इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंत रावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्री पदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

    *💥महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या.*
         
🔹- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)

🔸- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)

🔹- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)

🔸- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)

🔹- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)

🔸- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)
🔹- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)
❂~✧~~●~●★●~●~~✧~❂

 ★आवर्जून वाचावा असा एक प्रसंग....
    पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच. पण१९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर केली होती.
 तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले,  'माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी  हल्ला केला, व त्यात तिचा गर्भपात  झाला आणि गर्भाशय कायमचे  निकामी झाले'
यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला. 

   मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले. 
अंत्यत भावनिक होत त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली, पश्चाताप केला होता.
वेणुताई अत्रेंना म्हणाल्या 
भाऊ त्यानिमित्ताने तरी घरी आला.असे उदगार काढले होते.
तेव्हा अत्रेंना अश्रू अनावर झाले होते. आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले. 
ही महाराष्ट्रातील नेत्यांची  त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती. ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत  ?
हा यशवंतराव साहेबांचा 
महाराष्ट्र...

❂~✧~~●~●★●~●~~✧~❂
आजची संस्कृती म्हणजे 
तुला चप्पलने मारतो, कानशिलात मारतो, कोथळा काढतो.

No comments:

Post a Comment