━━═•●◆●★●◆●•═━━
●मृत्यू :~ ६ जून २००२
शांता शेळके
शब्दांवर मनापासून प्रेम करणार्या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, चित्रपटगीते, भावगीते, नाट्यगीते, बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि प्रकारांत विपुल लेखन केले. कालिदासाचे ’मेघदूत’ आणि अनेक जपानी हायकूंचा त्यांनी अनुवाद केला. ’वडीलधारी माणसे’ हे व्यक्तिचित्रण ’गोंदण’, ’वर्षा’, ’रुपसी’ इ. काव्यसंग्रह, ’रंगरेषा’, ’आनंदाचे झाड’ इ. ललित लेखसंग्रह, ’धूळपाटी’ हे आत्मचरित्र इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांनी ७० ते ७५ चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत.
No comments:
Post a Comment