*❒ प्रल्हाद केशव अत्रे ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते..●टोपणनाव :~ केशवकुमार
●जन्म :~ १३ ऑगस्ट १८९८, सासवड, महाराष्ट्र, भारत
●मृत्यू :~ १३ जून १९६९, परळ (मुंबई),महाराष्ट्र,
●कार्यक्षेत्र :~ साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
◆ प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे ◆
हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
◆ कारकीर्द ◆
इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६मध्ये 'रत्नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
◆ अत्रे वाङ्मय प्रदर्शन ◆
पुण्यातील सुहास बोकील हे आचार्य अत्रे यांच्या वाङ्मयाचे संग्राहक आहेत. ते अत्रे वाङ्मयाचे प्रदर्शन भरवीत असतात. फेब्रुवारी २०१६ पर्यंत बोकील यांनी अशी ४२ प्रदर्शने भरवली आहेत. प्रदर्शनात अत्र्यांची पुस्तके, वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे, कागदपत्रे, अत्र्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, ऑडिओ-व्हीडिओ आदींचा समावेश असतो.
No comments:
Post a Comment