*❒ ♦पांडुरंग सुखात्मे♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
ओळख शास्त्रज्ञांचीपांडुरंग वासुदेव सुखात्मे ( १९११ - १९९७)
हे प्रसिद्ध गणिती शास्त्रज्ञ होते. त्यांना इ.स. १९७१ साली भारतभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. "इंडियन ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट" या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा हातभार होता.
💥 आयुष्य 💥
पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म २७ जुलै, इ.स. १९११ रोजी महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातील बुध गावात झाला. इ.स. १९३२ मध्ये त्यांनी फर्गुसन कॉलेज मधून गणित विषयात पदवी मिळवली. इ.स. १९३३ ते १९३६ च्या काळात लंडन विद्यापीठात शिकत असताना त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली.
🔘 कार्यभार 🔘
१९४०-१९५१: इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च
१९५१-१९७१: फाओ (FAO)
⚅ योगदान -⚅
पांडुरंग सुखात्मे यांनी गणिती शास्त्रात मोलाचे काम केले , त्यांचे "स्टाटिस्टिकल थिअरी ऑफ स्यांपलिंग" वरील कामाची विशेष दाखल घेतली जाते.
No comments:
Post a Comment