"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 347

   *❒ ♦सुनील गावसकर♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●पूर्ण नाव :~ सुनील मनोहर गावसकर
●जन्म :~ १० जुलै, १९४९ मुंबई,महाराष्ट्र,भारत
●विशेषता :~ फलंदाज

        ★आंतरराष्ट्रीय माहिती★
●क.सा. पदार्पण ~ ६ मार्च १९७१विरुद्ध वेस्ट ईंडीझ
●शेवटचा क.सा. ~ १३ मार्च १९८७ विरुद्ध पाकिस्तान
●आं.ए.सा. पदार्पण~ १३ जुलै १९७४ विरुद्ध इंग्लंड

                       ◆ सुनील मनोहर गावसकर ◆
   हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. विशेषता फलंदाजी पद्धत उजव्या हाताने करत असे. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या.

                            ◆ पुरस्कार
     मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ११ डिसॆंबर २०१६ रोजी "जीवनगौरव" पुरस्कार देण्यात आला आहॆ. 

No comments:

Post a Comment