━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १० ऑक्टोबर १८९९ नाशिक
●मृत्यू :~ २२ मे १९९१
◆संघटना :~ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
◆प्रभाव :~ बाळ गंगाधर टिळक
★ श्रीपाद अमृत डांगे ★
ह्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन मुंबई प्रांतातील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६७ च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.
कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात.
डॉ. अशोक चौसाळकर यांनी लिहिलेले कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे चरित्र डांगे यांच्या जीवनकार्यांचा नेमका वेध घेते. या पुस्तकतील परिशिष्टे अभ्यासकांसाठी महत्वाची आहेत. बानी देशपांडे हे कमुनिस्ट पक्षाचे टोलेजंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणार्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे जावई- त्यांच्या रोझा नावाच्या मुलीचे पती होते. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे व त्यांच्यात गुरू-शिष्याचे नाते होते.
कम्युनिस्ट असले तरी त्यांना इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे हिंदुस्थानी परंपरागत तत्त्वज्ञान, वेदवाङ्मय याविषयी इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे घृणा नव्हती. त्यांचा संस्कृतचा आणि वेदान्ताचा गाढा अभ्यास होता. दोन वर्षांच्या अथक अभ्यासाअंती त्यांनी ‘युनिव्हर्स ऑफ वेदान्त’ हे पुस्तक लिहिले.
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी स्वतः या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. डायलेक्टिक्स वेदान्तात आहे, असे बानींनी पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकाला कॉ. डांगे यांनी प्रस्तावना दिल्यामुळे डांगे यांच्यावर कम्युनिस्टांनी त्यावेळी सडकून टीका केली होती. मात्र तरीही डांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
पक्षाध्यक्षपदी कॉ. डांगे या प्रकरणात डांगे यांच्या लोकसभेतील संस्मरणीय कामगिरी आपल्यासमोर येते. डांगे यांच्यासमोर कोणती आव्हाने होती हे देखील लक्षात येते. नव्या पिढीला डांगे याचे कर्तुत्व समजून घेण्यासाठी हे चरित्र महत्वाचे ठरावे.
No comments:
Post a Comment