"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

डॉ. सलीम अली

 ━━═•●◆●★◆★●◆●•═━
◆पूर्ण नाव :~ सलीम मोइनुद्दीन अब्दुल अली
●जन्म :~ १२ नोव्हेंबर १८९६, मुंबई
●मृत्यू :~ २७ जुलै १९८७

   🔶आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षितज्ञ. भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या निरिक्षणासाठी आखलेल्या विविध अभ्यास मोहिमा, दुर्मिळ पक्ष्यांचे लावलेले शोध, तसेच पक्ष्यांसंबंधी लिहिलेले अनेक ग्रंथ यांकरिता सलीम अली प्रसिद्ध आहेत. त्यांचे कार्य पक्षिविज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो.

    ♦वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गळ्यावर पिवळा डाग असलेली चिमणी पाळावयास विकत घेतली. त्यांना तो पक्षी कोणता हे ओळखता येत नव्हते, म्हणून ते मामांचे शिफारस-पत्र घेऊन मुंबईतील बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांना या पक्ष्याची सर्व माहिती मिळाली. यानंतर त्यांना पक्षी निरीक्षणाचा छंद लागला. पुढिल शिक्षण घेतल्या नंतर त्यांची बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीत मार्गदर्शक व्याख्याता या पदावर नियुक्ती झाली. दोन वर्षांनी ते पुढील प्रगत अभ्यासासाठी जर्मनीला बर्लिन विदयापीठात गेले (१९२९). तेथे त्यांना प्रसिद्घ पक्षितज्ञ एर्व्हिन श्ट्रेझमान यांचे मार्गदर्शन मिळाले. तेथे सलीम अली यांनी पक्ष्यांचे वर्गीकरण, शरीररचना शास्त्र, पक्ष्यांची कातडी काढणे, त्यात पेंढा भरून पुन्हा शिवणे, पक्ष्यांची मोजमापे घेणे यांचा अभ्यास केला.

     🔷१९३१ साली ते भारतात परत आले. बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे ते उपकार्यवाह व नंतर अध्यक्षही होते.
बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या मदतीने सलीम अली यांनी हैदराबाद राज्य पक्षिनिरीक्षण, त्रावणकोर-कोचीन पक्षिसर्वेक्षण, अफगणिस्तान पक्षिसर्वेक्षण, कैलास मानसरोवर पक्षियात्रा अशा पक्षिअभ्यासाच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. या मोहिमेत त्यांना लोक वॉन थो या छायाचित्रकार मित्राची मदत झाली. या पक्षिनिरीक्षण मोहिमेचे सलीम अली यांनी लिहिलेले अहवाल मार्गदर्शक समजले जातात.

     🔶सलीम अली यांनी सुगरण (बाया) पक्षी घरटी कशी बांधतात, त्यांच्या विणीच्या हंगामातील सवयी यासंबंधी विशेष अभ्यास केला. त्यांनी नोंदी, रेखाटने, छायाचित्रे यांचा वापर करून बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या नियतकालिकात सुगरण पक्ष्यावर लेख प्रसिद्ध केला.

    ♦सलीम अली यांनी ‘ इंडियन बोर्ड ऑफ वाइल्ड लाइफ ’ची स्थापना करण्यासाठी भारत सरकारकडे आग्रह धरला होता. या मंडळाची स्थापना झाल्यावर ते त्याचे सदस्य होते. त्यांच्या प्रयत्नातून भारतात केवलादेव घाना, चित्रस, पॉईंट कॅलीमर, हरिके लेक ही पक्षीद अभयारण्ये निर्माण झाली.

ताजमहाल नष्ट झाला तर पुन्हा बांधता येईल परंतु सायलंट व्हली सारखे जंगल एकदा नष्ट झाल्यावर पुन्हा उभारता येणार नाही" . त्यांनी केलेल्या शास्त्रीय वादावर सरकारने नमते घेउन इंदिरा गांधी सरकारने हे प्रकल्प स्थगित केले तसेच अंततः त्यांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देउन कायमचे संरक्षित केले. तसेच अनेक दुर्मिळ प्राणी व पक्षी यांबाबत आपल्या पुस्तकांद्वारे, संस्थेद्वारे, शिष्यांमार्फत केलेले सरकार तसेच सामान्य नागरिकात केलेले प्रबोधन भारतातील पर्यावरण चळवळीचा पाया ठरले. त्यामुळेच भारतातील आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉ अली यांचा समावेश होतो.
       ★ पुरस्कार ★
पद्मभूषण, (१९५८)
ब्रिटिश पक्षितज्ज्ञ संघाचे राष्ट्रीय पदक, (१९६७) द जॉन सी. फिलिप्स मेडल फोर डिस्टिंग्विश्ड सर्विस इन इंटरनाशनाल कनजर्वेशन, वर्लड कनजर्वेशन युनियनकडून, (१९६९)
पद्मविभूषण, (१९७६)
हॉलंड सरकारचा ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क, (१९८६) 

No comments:

Post a Comment