"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 158

  *❒ ♦उर्जित पटेल♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━  
*भारताचे नवे RBI Governor*

●नाव :~ *उर्जित आर.पटेल*
●जन्म :~  २८ सप्टेंबर १९६३,  गुजरात

                                  💰 *उर्जित पटेल* 💰
 🔴 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गर्व्हनरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🔴 ११ जानेवारी २०१३ मध्ये पटेल यांची आरबीआयमध्ये डेप्युटी गर्व्हनरपदी नियुक्ती करण्यात आली होती.

🔵 त्यांच्याकडे मुद्रा नीती विभागाची जबाबदारी होती. रघुराम राजन यांच्या आधीपासून त्यांनी आरबीआयच्या कामास सुरूवात केली होती.

 🔴 राजन आणि पटेल यांनी वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (आयएमएफ) एकत्रित काम केले आहे. राजन यांच्या निकटचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

🔵 २८ सप्टेंबर १९६३ साली जन्मलेल्या पटेल यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी केली आहे. बोस्टन कन्सलटिंग ग्रूपचे ते सल्लागार होते. आरबीआयच्या महत्वाच्या निर्णयात त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे.

 🔴 पीएचडी झाल्यानंतर पटेल  यांनी १९९० साली आयएमएफमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ते आरबीआयमध्ये सल्लागार म्हणून रूजू झाले. या काळात आर्थिक सुधारणांसाठी घेतलेल्या निर्णयात मोलाची भूमिका निभावली.

 🔵 त्यानंतर केंद्रीय अर्थ विभागाचे सल्लागार म्हणून त्यांनी १९९८ ते २००१ या काळात काम पाहिले. २०१३ मध्ये त्यांची डेप्युटी गर्व्हनरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

 🔴 पटेल यांच्यासमोर वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. राजन यांनी ज्याप्रमाणे आपल्या कामाचा ठसा भारतीय अर्थक्षेत्रात उमटवला होता. तशाच कामगिरीची पटेल यांच्याकडून अपेक्षा आहे.

*रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल :*

 🔵    रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबरपासून गृहीत धरला जाईल.

  🔴    जानेवारी 2013 पासून ते रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर आहेत. तसेच त्यांचा पहिला कार्यकाळ संपल्यानंतर 11 जानेवारी 2016 रोजी त्यांची डेप्युटी गव्हर्नरपदी 3 वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली होती.

 🔵     20 ते 25 अब्ज डॉलरच्या निधीची मुक्तता करणे, पतधोरण समितीची संकल्पना राबविणे आणि बँकांचा व्यवहार स्वच्छ करणे ही त्यांच्या समोरील काही प्रमुख आव्हाने आहेत.

 🔴    डेप्युटी गव्हर्नर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे विभाग हाताळले आहेत. पतधोरण ठरविण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे ते प्रमुख होते.

 🔵  ब्रिक्स देशांच्या केंद्रीय बँकांत समन्वय निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या आंतर-शासकीय करार आणि आंतर-केंद्रीय बँक कराराच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. ऊर्जित पटेल यांनी अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सेवेत होते.

 🔴    1996 ते 1997 या काळात ते नाणेनिधीतून रिझर्व्ह बँकेत प्रतिनियुक्तीवर आले. या काळात त्यांनी कर्ज बाजार, बँकिंग सुधारणा, पेन्शन सुधारणा आणि विदेशी चलन वाढविण्याबाबत त्यांनी रिझर्व्ह बँकेला बहुमोल सल्ला दिला. 

No comments:

Post a Comment