"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 275

   *❒ ♦दीपिका पडुकोण♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ५ जानेवारी १९८६, कोपनहेगन, डेन्मार्क
●कार्यक्षेत्र :~ अभिनय, मॉडेलींग

                            ★ दीपिका पडुकोण ★

    🔷 ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेली दीपिका आजच्या घडीला भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते.

   🔶 बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. तिची मातृभाषा कोकणी आहे तिला इंग्लिश भाषा, हिंदी भाषा, कन्नड, कोकणी या भाषा येतात. बेंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. शालेय वयात तिने राज्यस्तरावरील बॅडमिंटनपटू म्हणून नाव गाजवले. दीपिका अविवाहित आहे. तिच्या पहिल्याच हिंदी चित्रपटाला यश मिळाले.

     🔶 उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकीर्दीची सुरवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटातील भूमिकांना सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले.

No comments:

Post a Comment