"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 168

 *❒ ♦व्ही. शांताराम♦ ❒*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●पूर्ण नाव :~ शांताराम राजाराम वणकुद्रे
●जन्म :~ १८ नोव्हेंबर १९०१,  कोल्हापूर, महाराष्ट्र
●मृत्यू :~३० ऑक्टोबर १९९०, मुंबई

●कार्यक्षेत्र :~ चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार
◆कारकीर्दीचा काळ :~ १९२१-१९८७
◆भाषा :~ मराठी
◆प्रमुख चित्रपट :~ दो आँखे बारा हात, झनक झनक पायल बाजे,
डॉक्टर कोटनिस की अमर कहानी, गीत गाया पत्थरोने, नवरंग, पिंजरा, ,
 ◆ पुरस्कार  ●दादासाहेब फाळके पुरस्कार:१९८५, ●पद्मविभूषण पुरस्कार: १९९२

                          ◆ शांताराम राजाराम वणकुद्रे ◆
  म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली.

                             ◆ चित्रपटसूची ◆
    व्ही शांताराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने व्ही शांताराम फाउंडेशन नावाची एक संस्था काढली आहे. या फाउंडेशनने 'शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा' या नावाची एक मराठी चित्रपट सूची प्रकाशित केली आहे. या सूचीत १९१३ ते १९३१ या कालावधीत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ३७२ मूकपटांची नावे आहेत. त्या सूचीत 'अयोध्येचा राजा' या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटापर्यंतच्या २०० मराठी चित्रपटांचा समावेश आहे. कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटातील गीतांच्या ओळी अशा विशेष माहितीने ही सूची सजली आहे.

                       ◆ राजकमलचे चित्रपट ◆
   राजकमल कलामंदिरच्या सर्व चित्रपटांच्या नेगेटिव्ह्ज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवल्या आहेत.

                            ◆ चरित्र ◆
  मधुरा जसराज यांनी व्ही. शांताराम यांचे चरित्र लिहिले आहे.

 ◆व्ही.शांताराम यांच्यावरील अनुबोधपट ◆

पोट्रेट ऑफ ए पायोनियर : व्ही शांताराम (दिग्दर्शक- मधुरा जसराज)

                         ◆ ध्वनिफिती ◆
   सारेगमपा कंपनीने शांतारामबापूंच्या चित्रपटांतील लोकप्रिय गीतांची 'अमर मराठी चित्रगीते' ही ध्वनिफीत काढली आहे.

No comments:

Post a Comment