*❒ ♦विश्वनाथन आनंद♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●पूर्ण नाव : विश्वनाथन आनंद●जन्म :- ११ डिसेंबर १९६९,चेन्नई, तमिळनाडू, भारत
पद ग्रँडमास्टर -१९८८
विश्व अजिंक्यपद - २०००-२००२ (फिडे), २००७, २००८, २०१०, २०१२
फिडे गुणांकन २८०४
(क्र. १, नोव्हेंबर इ.स. २०१० फिडे गुणांकन यादी)
सर्वोच्च गुणांकन २८०४ (नोव्हेंबर इ.स. २०१०)
विश्वनाथन आनंद हा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने पाच वेळा बुद्धिबळातील जगज्जेतेपद मिळवले आहे. (२०००, २००७, २००८, २०१०, २०१२) तो २००७ पासून ते नोव्हेंबर २०१३ पर्यंत तो निर्विवाद बुद्धिबळ जगज्जेता राहिला आहे.
जेव्हा जगज्जेतेपदाचे स्थान विभागले गेले तेव्हा आनंद २००० मध्ये फिडे विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकला. तो २००७मध्ये निर्विवाद बुद्धिबळातील जगज्जेता झाला. २००८ मध्ये व्लादिमिर क्रॅमनिकला हरवून त्याने आपली पदवी अबाधित राखली. २०१० मध्ये व्हेसिलिन टोपोलावला हरवून आणि २०१२ मध्ये बोरिस गेल्फँडला हरवून त्याने पुन्हा दोनदा आपले विश्वविजेतेपद अबाधित राखले. २०१४ मध्ये मेग्नस कार्लसन याच्यासोबत नोव्हेंबर २०१३ मध्ये चेन्नई येथे झालेल्या विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
$ पुरस्कार $
÷÷÷÷÷÷÷÷÷÷
भारत सरकारचा खेळ पुरस्कार - अर्जुन अवॉर्ड (१९८५)
आनंदला भारत सरकारने पद्मश्री (१९८७), पद्मभूषण (२०००) व पद्मविभूषण (२००७) हे पुरस्कार दिले आहेत.
भारत सरकारचा सर्वोच्च खेळ पुरस्कार - राजीव गांधी खेळ रत्न (१९९१-१९९२) मिळणारा आनंद हा पहिला खेळाडू आहे.
स्पेन सरकारचा सर्वोच्च पुरस्कार - Jameo de Oro (२५ एप्रिल २००१).
चेस ऑस्कर - सहा वेळा (१९९७, १९९८, २००३, २००४, २००७, २००८ आणि २०आनंद
No comments:
Post a Comment