━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १ ऑकटोबर १९४५, कानपूरमधील पराउंख गावात
१७ जुलैला राष्ट्रपती निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे रालोआ उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झालेत.
रामनाथ कोविंद यांना ६५.३५% मते मिळाली तर मीरा कुमार यांना ३४.३५% मते मिळाली. प्रत्यक्ष मतांची आकडेवारी केल्यास कोविंद यांना एकूण ७ लाख २ हजार ०४४ तर मीरा कुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ मते मिळाली.
२५ जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आपल्या पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतली.
◆ रामनाथ कोविंद यांचा परिचय ◆
रामनाथ कोविंद मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराउंख गावात १ ऑकटोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला.
कानपूर विद्यापीठातून वाणिज्य आणि विधी शाखेची पदवी घेतली.
रामनाथ कोविंद हे पेशाने वकील आहेत. १९७७ ते १९७९ या काळात दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर पुढची १३ वर्षं त्यांनी सुप्रीम कोर्टात केंद्राची बाजू मांडली.
रामनाथ कोविंद कोळी जातीचे असून उत्तर प्रदेशात या जातीचा उल्लेख अनुसूचित जातीमध्ये केला जातो. पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे.
रामनाथ कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. रामनाथ कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला.
यानंतर ३ वर्षांनी १९९४ मध्ये यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. रामनाथ कोविंद भाजपकडून २ वेळा राज्यसभेवर निवडून आले.
१९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता. पक्षाचा दलित चेहरा असलेले रामनाथ कोविंद पक्षाचे प्रवक्तेदेखील राहिले आहेत. अनेक महत्त्वाच्या संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं.
८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली. भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी रामनाथ कोविंद यांनी सांभाळली. तसेच अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पहिले.
No comments:
Post a Comment